रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढेल!
कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरात थैमान घातले असून प्रत्येकाने स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे महत्वाचे आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारे घटक आहारामध्ये घेतल्यास आजारी पडण्याचा धोका आपण सहजपणे टाळू शकतो. म्हणूनच अशाच पोषक घटकांची माहिती पाहू!
ब्रोकली:-
१) ब्रोकलीमध्ये ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्वाशिवाय ग्लूटाथियोन नावाचे अँटिऑक्सिडंटही असते.
२) या भाजीमुळे रोगप्रतिकारक क्षमतेत चांगली वाढ होते.
३) ही भाजी पनीरबरोबर सॅलडसारखी खाल्ल्याने प्रोटिन आणि कॅल्शियमही मिळते.
संत्री:-
१) संत्र्यामध्ये ‘क’ जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असते.
२) संसर्ग आजाराशी सामना करण्यासाठी ते शरीराला बळ देते.
३) संत्र्याच्या सेवनामुळे पेशींच्या पृष्ठभागावर अँटिबॉडीजचा स्तर बनतो. त्यामुळे विषाणूंचा संसर्ग होण्याचा धोका कमी होतो.
४) यातील ‘क’ जीवनसत्त्व शरीरातील चांगले कॉलेस्ट्रॉल वाढवते.
पालक:-
१) या भाजीत फोलेट नावाचा महत्त्वाचा घटक शरीरात नव्या पेशी बनवण्यासाठी तसेच पेशींमधील डीएनएच्या डागडुजीसाठी महत्त्वाचा ठरतो.
२) पालकमधील लोह, फायबर, अँटिऑक्सिडंट घटक तसेच ‘क’ जीवनसत्त्व शरीराला निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात.
हळद:-
१) हळदीत अँटिऑक्सिडंटस मोठ्या प्रमाणात असल्याने हळदीला ‘इम्युनिटी बूस्टर’ असेही म्हटले जाते.
२) रक्त शुद्ध करण्यापासून ते शरीराचे रंगरूप उजळण्यापर्यंत अनेक बाबतीत हळद उपयक्त आहे.
३) हळदीमधील गुण कर्करोग, सांधेदुखी आणि अल्झायमर्ससारखे आजार दूर ठेवण्यास उपयुक्त आहेत.
दालचिनी:-
१) दालचिनीमध्ये अँटिऑक्सिडंटस् मोठ्या प्रमाणात असते. ते रक्ताची गुठळी तयार होण्यापासून वाचवतात आणि हानिकारक जीवाणूंना आळा घालतात.
२) रक्तदाब व कॉलेस्ट्रॉलचा स्तर नियंत्रित ठेवण्यासाठीही दालचिनीमधील घटक उपयुक्त आहेत.
दही:-
१) दह्यामध्ये दुधाच्या तुलनेत अधिक कॅल्शियम असते.
२) अनेक प्रकारचे उपयुक्त जीवाणू आणि पोषक घटकही असतात. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
३) प्रोटिन, लॅक्टोज, कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोहतत्त्व दह्यात असते. पोट बिघडल्यावरही दह्याचे सेवन उपयुक्त ठरते.
जवस:-
१) जवसात अल्फा लिनोलेनिक अॅसिड, ओमेगा थ्री आणि फॅटी अॅसिड असते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी जवस अत्यंत उपयुक्त आहे.
२) जवसाच्या नियमित सेवनाने अनेक आजारांपासून संरक्षण होऊ शकते. जवसात अल्फा लिनोलेनिक अॅसिड, ओमेगा थ्री आणि फॅटी अॅसिड असते. त्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते. ‘ओमेगा थ्री’ हे शरीरात नैसर्गिकरीत्या बनत नाही तर ते आहारातूनच घ्यावे लागते. एरव्ही ते मत्स्याहारात असते, शाकाहारींना ते जवसातून मिळू शकते.
मशरूम:-
१) मशरूम म्हणजेच आळिंबी ‘ड’ जीवनसत्त्वाचा मोठा स्रोत आहे. अन्यही अनेक पोषक घटक असतात.
२) पांढऱ्या रक्तपेशींच्या कार्याला वाढवून रोग प्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी मशरूम अत्यंत उपयक्त आहे.
३) शरीराला कर्करोगाविरुद्ध लढण्याचीही क्षमता देत असते.
मिरची:-
१) मिरची केवळ झणझणीत असते असे नाही तर ती शरीर निरोगी ठेवण्यासाठीही मदत करते.
२) मिरची शरीरात नैसर्गिकपणे ‘ब्लड थिनर’चे म्हणजे रक्त पातळ करण्याचे काम करते.
३) चयापचय क्रिया सुधारण्यासाठीही मिरची उपयुक्त आहे.
४) मिरचीतील बीटा कॅरोटिन शरीरात ‘अ’ जीवनसत्त्वामध्ये रूपांतरीत होते. त्यामुळे अनेक विषाणूंशी लढण्याची क्षमता शरीराला मिळते.
सुका मेवा:-
१) बदाम, काजू, अक्रोड, खारीक यामध्ये ‘अ’ जीवनसत्त्व असते.
२) अनेक प्रोटिन, खनिज, फायबर आणि मॅग्नेशियमही मोठ्या प्रमाणात असल्याने रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
३) शरीरातील तांबड्या रक्तपेशी वाढण्यास सुक्या मेव्याने मदत मिळते.