दुर्धर आजाराच्या नैराश्येपोटी हिंमाशू रॉय यांची आत्महत्या!

कर्तव्यदक्ष वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला जनताही मुकली!

मुंबई:- १९८८ च्या तुकडीचे पोलीस अधिकारी आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक (नियोजन आणि समन्वय) हिमांशू रॉय यांनी मुंबईतील मलबार हिल येथील निवासस्थानी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. मागील दोन वर्षापासून कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने त्यांना घेरले होते. त्यावर ते उपचार घेत होते त्यामुळे ते दोन वर्षापासून वैद्यकीय रजेवर होते. दुर्धर आजारातून ते बाहेर पडतील, अशी त्यांची स्वत:ची खात्री होती; परंतु आज त्यांनी आत्महत्या करून आपले जीवन संपविले. त्यांच्या पार्थिवावर दक्षिण मुंबईतील चंदनवाडी स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आत्महत्येपूर्वी रॉय यांनी लिहिलेल्या चिट्टीमधील मजकूरानुसार त्यांनी नैराश्यातून हे पाऊल उचलल्याचे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. रॉय यांच्या मागे आई, पत्नी असा परिवार आहे.

अनेक प्रकरणात त्यांनी यशस्वी तपास करून कर्तव्य बजावले होते. अशाप्रकारे अचानक जाण्यामुळे पोलीस दलाला हादरा बसला आहे. कर्तव्यदक्ष वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला जनताही मुकली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *