कणकवलीतील पत्रकारांचा सामाजिक बांधिलकीतून उभा राहिला आदर्श
भिरवंडे येथे श्रमदानातून पत्रकारांनी बांधला पहिला वनराई बंधारा; उपक्रमाचे ग्रामस्थांनी केले स्वागत
कणकवली:- कणकवली तालुका पत्रकार संघ कणकवलीच्यावतीने समाजासमोर एक सामाजिक बांधिलकी म्हणून ‘पाणी अडवा…पाणी जिरवा’ या उपक्रमाअंतर्गंत जलसंधारणासाठी वनराई बंधारे ग्रामस्थ व सामाजिक संस्थांच्या मदतीने बांधण्याचे ठरविले होते. त्यानुसार भिरवंडे-हनुमंतवाडी कॉजवे येथे २० मीटर लांबीचा व ६ फुट उंचीचा ६०० सिमेंट पिशव्या माती भरुन बंधारा घातला. या बंधाऱ्याचा शुभारंभ जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवनू झाला़. कणकवलीतील पत्रकारांनी या उपक्रमातून समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे.
https://www.youtube.com/watch?v=fuU93mzFfzk&t=1s
भिरवंडे येथे कणकवली तालुका पत्रकार संघ व भिरवंडे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने हा वनराई बंधारा बांधण्यात आला. या वनराई बंधाऱ्यात साठलेल्या पाण्यामुळे चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना लाभ होऊन पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे. या बंधाऱ्याच्या शुभारंभ प्रसंगी भिरवंडे सरपंच मिलिंद सावंत, पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके, जेष्ठ पत्रकार संतोष वायंगणकर, विजय शेट्टी, माधव कदम, गणेश जेठे, सचिव- नितीन सावंत, खजिनदार माणिक सावंत, माजी अध्यक्ष संतोष राऊळ, अजित सावंत, तुषार सावंत, नितिन कदम, संजोग सावंत, दत्तात्रय मारकड, पंढरीनाथ गुरव, विनोद जाधव, संदीप गजोबार, मिलिंद डोंगरे, विनय सावंत, पंचायत समिती सदस्य मंगेश सावंत, उदय तावडे, ग्रामसेवक राकेश गोळवणकर, पोलीस पाटील बाळकृष्ण सावंत, आरोग्य सहाय्यक आर.जी.चव्हाण, ग्रामस्थ महादेव सावंत, दशरथ सावंत, भिकाजी सावंत, अशोक सावंत, कृष्णाजी सावंत, प्रकाश घाडीगावकर, विल्सन डिसोजा आदी भिरवंडे ग्रामस्थ व पत्रकार मोठया संख्येने या सामाजिक उपक्रमात सहभागी झाले होते.
हा बंधारा भरल्यानंतर भिरवंडे गावातील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे़ सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या पुढाकाराने हा बंधारा बांधण्यात आला़. या बंधाऱ्यासाठी लागणाऱ्या रिकाम्या सिमेंट पिशव्या व इतर साहित्य सतीश सावंत यांनी उपलब्ध करून दिले़. सात थर माती पिशव्या भरून हा बंधारा बांधण्यात आला़ सुमारे ६०० पिशव्या या बंधाऱ्यासाठी वापरण्यात आल्या़ ग्रामस्थ व पत्रकार एकत्रित येऊन सिंधुदुर्गात हा पहिला वनराई बंधारा बांधण्यात आला आहे़. या अभिनव उपक्रमाचे भिवरंडे ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.
कणकवली पत्रकार संघाचा अभिनव उपक्रम! – सतीश सावंत
कणकवली तालुका पत्रकार संघाच्या वतीने वनराई बंधारा बांधण्याचे काम हाती घेतले आहे़. सिंधुुदुर्ग जिल्ह्यात पत्रकारांनी पुढाकार घेऊन बांधलेला हा पहिला बंधारा आहे़. प्रतिनिधी स्वरूपात हा बंधारा बांधण्यात आला असून समाजासमोर आदर्श ठेवलेला आहे़. समाजातील विविध घटकांनी भविष्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जास्तीत जास्त वनराई बंधारे बांधावेत, अशी प्रतिक्रीया जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी शुभारंभ प्रसंगी व्यक्त केला.