आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग हे युवा व्यक्तिमत्व विकासाचे प्रभावी माध्यम- डॉ. भरमू नौकुडकर
कणकवली कॉलेजच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे उद्घाटन
कणकवली:- “विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत मुंबई विद्यापिठात आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग कार्यरत आहे. या विभागामार्फत विविध युवा विकासाचे उपक्रम घेण्यात येतात. या उपक्रमातून विद्यार्थी वर्गाचे व्यक्तिमत्व प्रभावीपणे घडवता येते. विद्यार्थी वर्गासाठी व्यवसाय विकासाचे तसेच सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे उपक्रम राबविण्यात येतात. यामुळे विद्यार्थी वर्गाचे व्यक्तिमत्व सजग व्हायला प्रेरणा मिळते” असे प्रतिपादन कणकवली महाविद्यालयाचे व्यावसायिक अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉक्टर भरमू नौकुडकर यांनी महाविद्यालयाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाच्या उदघाटन प्रसंगी बोलताना केले.
`जास्तीत जास्त विद्यार्थी वर्गाने या उपक्रमात सहभागी होऊन आपले व्यक्तिमत्व फुलवावे’ असेही त्यांनी आवाहन केले. यावेळी विभाग प्रमुख डॉक्टर राजेंद्र मुंबरकर, माजी विद्यार्थी व्यवस्थापक प्रथमेश कांबळे, विद्यार्थी व्यवस्थापक चिंतामणी सामंत, सागर कदम, सुस्मिता लाड, सिद्धी वरवडेकर आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सर्व विद्यार्थ्यांना आजीवन अध्ययन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांची माहिती देण्यात आली. या प्रशिक्षणात विद्यार्थी व्यवस्थापक चिंतामणी सामंत यांनी करिअर प्रकल्प; तर सागर कदम, नेहा घोणे यांनी महिलांच्या सामाजिक दर्जाचा अभ्यास याबाबत मार्गदर्शन केले. सुस्मिता लाड आणि रश्मी सावंत यांनी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ उपक्रम; तर सिद्धी वरवंडेकर आणि पल्लवी कोंकणी यांनी लोकसंख्या शिक्षण क्लबबाबत अभ्यासपूर्ण माहिती दिली. शुभम मठकर यांनी अन्नपूर्णा योजना या प्रकल्पाची माहिती विद्यार्थ्यांना पॉवर पॉईंटच्या माध्यमातून दिली. यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांनी विविध प्रकल्पाची निवड केली.
यावेळी गतवर्षातील सहभागी विद्यार्थी मधुरा गावकर, भाग्यश्री घोगळे, प्रथमेश लाड, अंकिता कदम, सीमा हडकर, सिद्धी गुडेकर यांनी आपण आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागामार्फत कसे घडलो? याचे अनुभव उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितले. या विभागामुळे आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली, सामाजिक भान आले, आपल्यातील स्वतःविषयीचा न्यूनगंड कमी झाला; असे अनेक अनुभव त्यांनी कथन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नेहा घोणे यांनी आणि उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन चिंतामणी सामंत यांनी केले. प्रशिक्षण सत्राचे सूत्रसंचालन पूजा बुचडे यांनी केले; तर उद्घाटन सत्राचे आभार तेजश्री आचरेकर व प्रशिक्षण सत्राचे आभार चैताली सामंत यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विद्यार्थी व्यवस्थापक तसेच सिद्धी गुडेकर, दुर्गानंद जावडेकर, सुदर्शन मेस्त्री, प्रसाद सावंत, प्रज्ञा कदम, अंकिता कदम यांनी विशेष मेहनत घेतली.
(छायाचित्र- कणकवली कॉलेजच्या आजीवन अद्ययन आणि विस्तार विभागाचे उद्घाटन करताना डॉ. भरमु नौकुडकर, बाजूला विभागप्रमुख डॉ. राजेंद्र मुंबरकर आणि माजी विद्यार्थी व्यवस्थापक प्रथमेश कांबळे, विद्यार्थी व्यवस्थापक सिद्धी वरवडेकर, सुस्मिता लाड, चिंतामणी सामंत, सागर कदम आदी)