भारतात वायू प्रदूषणामुळे दरवर्षी सरासरी २० लाख लोक मृत्यूमुखी
भारतात २०१६ साली ५ वर्षाखालील एक लाख बालकांचा प्रदूषित हवेने मृत्यू
नवीदिल्ली:- भारतासह जगभरात हवेचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असून त्याचे गंभीर दुष्परिणाम समोर येत आहेत. जागतिक आरोग्य संस्थेने आपल्या अहवालात अनेक मुद्दे नमूद केले आहेत. त्यातील ठळक मुद्दे खालील प्रमाणे आहेत.
१) भारतात २०१६ साली ५ वर्षाखालील एक लाख पेक्षा अधिक बालकांचा प्रदूषित हवेने मृत्यू झाला.
२) २०१६ साली जगभरात वायू प्रदूषणामुळे १५ वर्षाखालील ६ लाख मुलांचा बळी गेला.
३) भारतात वायू प्रदूषणामुळे दरवर्षी सरासरी २० लाख लोक मृत्यूमुखी पडतात.
४) भारतामध्ये हवेतील नाइट्रोजन ऑक्साइड ह्या वायूचे उत्सर्जन सर्वात जास्त असल्याने वायू प्रदूषण वाढल्याची गंभीर बाब ह्या अहवालातून पुढे आली आहे.
५) भारतात २.५ पीएमच्या प्रदूषणामुळे (हवेमध्ये २.५ माइक्रोमीटर पेक्षा कमी आकाराचे कण) मृत्यूंचे प्रमाण अधिक आहे.
६) भारताच्या खालोखाल नायजेरियामध्ये दरवर्षी ४७ हजार लहान मुलं वायू प्रदूषणाचे बळी ठरतात.
७) भारतात एकूण ३२ हजार मुली वायू प्रदूषणामुळे मृत्यूमुखी पडल्या.
८) जगातील वायू प्रदूषणाचे २५ टक्के बळी हे भारतातच जातात.
असे अनेक गंभीर मुद्दे ह्या अहवालात आहेत; त्याकडे भारतातील प्रत्येक नागरिकाने दुर्लक्ष करून चालणार नाही.