गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेचे आरक्षण होते काही सेकंदात फुल्ल!
`गणपतीक गावाक जायचा कसा?’ चाकरमानी वेटिंगवर…..
मुंबई- काही सेकंदात कोकण रेल्वे मागार्वरून धावणाऱ्या गाड्या फुल्ल होतात; त्यामुळे दरवर्षीप्रमाणे पडणारा प्रश्न यावर्षीही पडणार आहे. `गणपतीक गावाक जायचा कसा?’ हा भला मोठा प्रश्न घेऊन चाकरमानी चार महिने काळजीत पडलेला असतो.
काल ७ सप्टेंबर २०१८ आणि आज ८ सप्टेंबर २०१८ तारीखचे आगावू आरक्षण झाले. परंतु काही सेकंदात गाड्या फुल्ल झाल्या होत्या. ऑनलाईन तिकीट काढणाऱ्यांच्या हाती वेटिंगची तिकीट येत होती.
चार महिने आधी मे महिन्यातच गणपतीक गावाला जाण्यासाठी चाकरमानी रांगा लावत आहे; पण एजंटची सेटिंग, ऑनलाइन बुकिंग आणि देशभरातून तिकीट बुकिंग होत असल्याने चाकरमान्यांना यंदाही वेटिंगवरच राहावे लागणार आहे. गणेश चतुर्थीसाठी कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्यांचे बुकिंग फुल्ल होत असल्याने चाकरमानी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही काळजीत राहणार आहे.
रेल्वेच्या नियमाप्रमाणे प्रवास दिवसाच्या चार महिने म्हणजे १२० दिवस आधी तिकीट बुकिंग करावी लागते. १३ सप्टेंबर २०१८ रोजी गणेश चतुर्थी असल्याने कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांनी ७ मे पासूनच रांगा लावत आहेत. ज्यावेळी सकाळी आठची वेळ येते त्यावेळी चाकरमानी निराश होतात. पहिल्या-दुसऱ्या नंबरवरच चाकरमान्यांच्या हातात वेटिंग तिकीट मिळत आहे. पुढील पाच सहा दिवसात परिस्थितीत बदल होईल असे वाटत नाही.