कोकणात व्यवसाय विकासासाठी `कोकण कॉन्क्लेव्ह’ची महापरिषद

मुंबई- व्यवसाय विकासासाठी `कोकण कॉन्क्लेव्ह’ची महापरिषद २० व २१ मे रोजी मुंबईतील सहारा स्टार येथे सुरू होणार असून २१ मे रोजी रायगड, २२ मे रोजी रत्नागिरी आणि २३ मे रोजी सिंधुदुर्गात तिचे उपक्रम होणार आहेत. 

महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांच्या भरभक्कम पाठबळाने आयोजित होत असलेल्या कोकण कॉन्क्लेव्हमध्ये जागतिक नेते, सहल आयोजक, गुंतवणूकदार, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी आणि प्रथितयश संस्था-संघटनांचे नियुक्त खरेदी अधिकारी (होस्टेड बायर) यांची उत्साहवर्धक उपस्थिती लाभणार आहे.
फक्त कोकण विभागाला केंद्रस्थानी ठेवून प्रदर्शन, चर्चासत्रे आणि कार्यशाळांच्या संतुलित मांडणीतून कोकणातील पर्यटनाच्या आणि व्यवसायाच्या संधी या महापरिषदेच्या सदस्यांसमोर सादर करण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी http://KonkanConclave.com ही लिंक पाहता येईल.

ठळक वैशिष्ट्ये
-प्रमुख भागधारकांचे जागतिक संमेलन

– ६००हून अधिक व्यावसायिक प्रतिनिधी आणि गुंतवणूकदारांचा (राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय) सहभाग,

-५० हून अधिक प्रदर्शक

-५० हून अधिक होस्टेड बायर्स

-५० हून अधिक वक्ते (राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय)

-एका खास कॉफी टेबल बुकचे प्रकाशन

-सरकारचा धोरणात्मक सहभाग आणि भागीदारी

-कोकण विभागाचा रोड शो चर्चासत्रे आणि कार्यशाळांसाठी कोकण विभागातील उद्योजक सहभागी होणार आहेत.

-त्यांना मार्गदर्शन करण्याकरिता जागतिक कीर्तीचे मसालाकिंग धनंजय दातार, जगप्रसिद्ध प्रिन्सेस वाईनच्या उद्योजिका व महाराष्ट्राच्या फर्स्ट वाईन लेडी अचलाताई जोशी, अन्न व फळप्रक्रिया संशोधन याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. स्मिता लेले, कुलसचिव, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी, मुंबई उपस्थित राहतील.

-या शिवायही इतर अनेक मान्यवर या महापरिषदेत कोकणातील विकासकांना मार्गदर्शन करतील.

-स्वागत मुल्य रुपये ५९००/- ( GST १८% सह) अधिक माहितीसाठी श्री. दिनेश कानजी-9819573101 व श्री. समीर गुरव 9892008805 यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

One thought on “कोकणात व्यवसाय विकासासाठी `कोकण कॉन्क्लेव्ह’ची महापरिषद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *