पंतप्रधान मोदींच्या हस्ते ‘Statue of Unity’चे लोकार्पण
सरदार पटेल यांचे जगातील सर्वात उंच १८२ मीटर उंचीच्या पुतळ्यासह स्मारकाचे लोकार्पण
सरदार पटेलांमध्ये कौटिल्याची कुटनिती आणि शिवाजी महाराजांचे शौर्य – पंतप्रधान
गुजरात:- सरदार वल्लभभाई पटेलांमध्ये कौटिल्यची कुटनिती आणि शिवाजी महाराजांच्या शौर्य दिसून येते होते. `देशात आपापसात होणाऱ्या भांडणांमुळे आपले नुकसान होत आहे. त्यामुळे आता आपल्याला एकमेकांत लढायचे नाही.’ ह्या त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याने सर्व संस्थाने खालसा झाली. त्यानंतर देश एक झाला. संस्थानिकांचा त्यागही आपल्याला विसरता येणार नाही; असे उदगार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काढले.
भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची आज १४३ वी जयंती. त्याचेच औचित्य साधत गुजरातमधील नर्मदा नदीकिनारी बांधण्यात आलेल्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे आज लोकार्पण झाले. सरदार पटेल यांंचा हा जगातील सर्वात उंच पुतळा असून उंची १८२ मीटर आहे. मराठमोळे शिल्पकार राम सुतार यांनी हा पुतळा साकारला आहे. संपूर्ण ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ निर्माण करण्यासाठी ४४ महिने एवढा कालावधी लागला.