करोडो लोकांनी पाहिलेला व राजकीय भाष्य करणारा व्हिडीओ!

अबब! देशाच्या राजकारणावर तयार केलेल्या युट्युबवरील एका व्हिडिओला फक्त ११ दिवसात १ कोटी ९४ लाख ७४ हजार १६९ लोकांनी पाहिले. दर दिवशी सुमारे १७ लाखांपेक्षा अधिक लोक हा व्हिडीओ पाहत आहेत. त्यामुळे सत्ताधारी समर्थक संताप व्यक्त करीत आहेत. तर १८ लाख लोकांनी ह्या व्हिडिओला लाईक केलेतर ३ लाखांपेक्षा जास्त लोकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सदर व्हिडिओ खाली दिला आहे.

 

८ ऑक्टोबर १९९४ रोजी जन्माला आलेला एक भारतीय युट्युबर ध्रुव राठी राजकीय आणि पर्यावरणविषयक समस्यांवरील त्याच्या युट्युब व्हिडिओंसाठी ओळखला जातो. त्याचे १ कोटी ५४ लाख सबस्क्राइबर आहेत. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात राजकीय भूमिका असल्याने त्याला जबरदस्त ट्रोलला सामोरं जावं लागतंय. लोकसभेच्या मागील दोन निवडणुकींमध्ये समाजमाध्यमांचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. त्याचा वापर भाजपाने सुनियोजितरीतीने केला. ह्यावेळी मात्र समाजमाध्यमांमध्ये विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांना विरोध करणारे पत्रकार वरचढ ठरताना दिसत आहेत. त्यांच्या व्हिडीओंना लोकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

कोरोना महामारीनंतर ऑक्सिजनवर असणारी मुद्रित माध्यमं व्हेंटिलेटरवर गेली. तर प्रत्येकाच्या हातात मोबाईलच्या माध्यमातून टेलिव्हिजनपेक्षा प्रभावी माध्यमं आल्याने टेलिव्हिजनचं माध्यमही शेवटची घटका मोजत आहे. त्यामुळे युट्युब, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाटसऍप, टेलिग्राम, ट्विटर ह्या समाजमाध्यमांची सध्या चलती आहे. त्याचा योग्य वापर जो राजकीय पक्ष करून घेईल तोच सत्तेला गवसणी घालणार आहे. एवढे निश्चित! म्हणूनच ह्या आंतरजाल अर्थात इंटरनेटवरील समाजमाध्यमांची दखल घेणे आज सर्वांसाठी गरजेचे ठरले आहे. ध्रुव राठीने तयार केलेल्या व्हिडिओची चर्चा फारच होत आहे. ध्रुव राठी व्हिडिओतून मांडत असलेल्या गोष्टी योग्य की अयोग्य हे ठरविण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. कारण लोकशाही देशात हे स्वातंत्र्य आहे. ते स्वातंत्र्य जे कोणी अमान्य करीत असतील तर ते लोकशाहीला बाधा आणत आहेत; हे समजून घ्यायला पाहिजे!

(सूचना-सदर व्हिडिओतील मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही!)

You cannot copy content of this page