डॉ. नागवेकर हॉस्पिटल- अत्याधुनिक सुविधांचा वापर करून रुग्णसेवेस तत्पर!
तीन पिढ्या ग्रामीण भागात रुग्णांची सेवा करणारे नागवेकर कुटुंब!
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व प्रकारचे सेवा देणारे एकमेव हॉस्पिटल म्हणजे डॉ. नागवेकर हॉस्पिटल अॅण्ड नर्सिंग होम. जिल्ह्यातील रुग्णांची गरज लक्षात घेऊन त्यांनी अनेक आधुनिक उपचार पद्धती सुरु केल्या आहेत. यामध्ये वरदान फर्टिलिटी अॅण्ड टेस्टट्यूब बेबी सेंटर, वेस्टर्न रिजनल डायग्नास्टिक सेंटर आणि नव्याने सुरु झालेले नागवेकर ट्रामा केअर सेंटर यांचा समावेश आहे. या आधुनिक उपचार पद्धतीचा जिल्हावासियांना फायदा होत आहे. त्यामुळे डॉ. नागवेकर हॉस्पिटल रुग्णांसाठी तारक ठरले आहे. ह्या हॉस्पिटलची यशकथा प्रेरणादायी आहे.
४ एप्रिल १९८६ मध्ये डॉ. अनंत रघुनाथ नागवेकर व सौ. कीर्ती अनंत नागवेकर या दांपत्याने शासकीय सेवेला विराम देत परमपूज्य भालचंद्र महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कणकवलीत डॉ. नागवेकर हॉस्पिटल अॅण्ड नर्सिंग होमचा शुभारंभ केला. डॉ. नागवेकर यांची तिसरी पिढी वैद्यकीय क्षेत्रात काम करीत आहे. ७५ वर्षापूर्वी डॉ. नागवेकर यांचे वडिल कै. डॉ. रघुनाथ नागवेकर यांनी वैद्यकीय सेवेस सुरुवात केली. घोड्यावरून किंवा पायी प्रवास करून ग्रामीण भागात त्यांनी दिलेल्या रुग्ण सेवेचा आदर्श आजही कौतुकास्पद असा आहे. त्यांनी केलेली रुग्णसेवा अजूनही लोक विसरलेले नाहीत. त्यांचा वैद्यकीय सेवेतील अनुभव दांडगा होता. त्या अनुभवाच्या जोरावर उन्हा पावसाची पर्वा न करता, रस्ता नसलेल्या ठिकाणी घोड्यावरून प्रवास करून अनेक रुग्णांना औषधोपचाराने त्यांनी बरे केले. रुग्णाबद्दल असलेली तळमळ आजही डॉ. नागवेकरांच्या तिसऱ्या पिढीमध्येही तशीच दिसून येते. आजोबांची पुण्याई पाठीशी बांधून त्यांची तिसरी पिढी ही परंपरा कायम अखंडपणे पेलत वैद्यकीय क्षेत्रात नवनवीन शिखरे पादाक्रांत करीत आहेत.
कणकवलीतील `डॉ. नागवेकर हॉस्पिटल अॅण्ड नर्सिंग होम’ रुग्णसेवेसाठी तत्पर!
येथे सेव देत असलेल्या डॉ. अनंत व डॉ. किर्ती नागवेकर यांच्या सोबतच डॉ. मयुर नागवेकर पोटविकारशास्त्रात सुपरस्पेशालिटी (M.S., DNB, GI-Surgery), डॉ. मीनल मयुर नागवेकर (एम डी, डीएनबी, स्त्रीरोगतज्ञ) व डॉ. रघुनाथ उर्फ अमोल नागवेकर हे (एम डी. रेडियोलॉजी), तसेच डॉ. पुजा अमोल नागवेकर (DMRD, DNB) याही वैद्यकीय क्षेत्रात आपलं भरीव योगदान देत आहेत. पुणे-मुंबई, बेंगलोर, हैद्राबाद, चैनईसारख्या मेट्रोसिटीमध्ये असलेल्या सेवा सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेला देण्यासाठी ही मंडळी सज्ज आहेत.
सुरुवातीला आठ बेडचे असलेले डॉ. नागवेकर हॉस्पिटल आज नव्या रुपात दिमाखात उभे आहे. ५० हून अधिक बेडच्या आजच्या या हॉस्पिटलमध्ये २४ तास इमर्जन्सी सेवा, व्हेंटिलेटर, प्रशिक्षित नर्सेस व स्टाफ, २४ तास जनरेटर बॅकअप, सुसज्ज लॅब, डायलेसिस सेंटर, रक्तपेढी आणि आता ट्रामा केअर सेंटर यासह आज मल्टिीसिटीमधील मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व सेवा-सुविधा उपलब्ध आहेत. सिंधुदुर्गसारख्या जिल्ह्यात अनेक अडथळे दूर करीत रुग्णालयाने आपली घौडदौड अखंड चालू ठेवत समाजसेवेचा एक आदर्श मापदंड जिल्ह्यात उभा केलेला आहे. उत्कृष्ट संगणकीय कार्यप्रणालीचा अवलंब करुन व त्याचा आधार घेत सर्व सोईसुविधा या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत. डॉक्टरांची उच्च शिक्षित मुले व सुना मोठ्या शहराकडे धाव न घेता आपली वैद्यकीय सेवा जिल्हावासियांना प्रदान करतात. कोकणात नसलेली सोय नागवेकर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असते. २०१४ साली रत्नागिरी-सिंधुदुर्गातील पहिले टेस्ट ट्युब बेबी सेंटर सुरु करण्यात आले. या यशामुळे दुसरी शाखा मुंबई येथे सुरु केली आहे.
डॉ. मिनल नागवेकर स्त्रीरोग तज्ञ म्हणून ह्या हॉस्पिटलमध्ये काम करतात. त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्यास युरोप, फ्रान्स येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण पूर्ण केले. त्याच्या वरदान टेस्ट ट्युब बेबी सेंटरचा लाभ अनेक दांपत्यांना मिळत आहे.
वैद्यकीय क्षेत्रात अनेक शोध लागत असले तरी आजारावर महागडे औषधोपचार करावे लागतात. त्यामुळे कुठल्याच डॉक्टरांना गरीबांसाठी मोफत सेवा देणे शक्य होत नाही. अशावेळी गरीबांना मोफत सेवा उपलब्ध व्हावी यासाठी नागवेकर हॉस्पिटलच्या माध्यमातून ट्रस्ट स्थापन करण्यात आली आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून गरीब रुग्णांना वैद्यकीय सेवा दिली जाते. डॉ. नागवेकर हॉस्पिटलच्या माध्यमातून दोन वर्षापूर्वी वेस्टर्न रिजनल डायग्नोस्टिक सेंटर कनकरोड नरवडे रस्ता रेल्वे स्टेशन जवळ सुरु करण्यात आले आहे. यामुळे सिंधुदुर्गवासियांना एमआरआय, सिटी स्कॅन, ३डी/४डी सोनोग्राफी, इको, एक्स रे इत्यादी सेवेचा लाभ होत आहे. या सोयीमुळे गर्भावस्थेतील बाळांच्या दोषांपासून ते नवजात बाळाच्या तपासण्या, व्हेरीकोज व्हेनपासून ते कॅन्सरपर्यंतचे निदान करणे जिल्ह्यातच शक्य होत आहे.
वेस्टर्न रिजनल डायग्नोस्टिक सेंटर येथे GE कंपनीचे `व्हॅल्यूसन E-8 रेडियन्स’ हे सर्वात अत्याधुनिक ३डी/४डी सेवा उपलब्ध असलेले मशिन महाराष्ट्रात मुंबईनंतर सर्वप्रथम डॉ. नागवेकर हॉस्पीटलला सुरु झाले. या मशिनच्या माध्यमातून अनेक अत्याधुनिक चाचण्या करता येतात. तसेच या मशिनमध्ये नवीन इलास्टोग्राफी अत्याधुनिक तंत्रज्ञान असून त्या माध्यमातून कॅन्सरचे निदान करण्यास सोपे जाते.
रुग्णांना चांगली सेवा मिळावी त्यासाठी डॉ. मयुर नागवेकर, डॉ. सौ मिनल नागवेकर, डॉ. अमोल नागवेकर, डॉ. सौ. पुजा नागवेकर आणि त्यांच्या सहकार डॉक्टरांचे प्रयत्न असतात. सिंधुदुर्गच्या वैद्यकिय क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या डॉ. नागवेकर कुटुंबियांना धन्यवाद द्यावेच लागतील. अशा या डॉ. नागवेकर हॉस्पिटल अॅण्ड नर्सिग होमच्या भावी वाटचालीस आमच्याही हार्दिक शुभेच्छा!
-दिलीप हिंदळेकर