खूप जड अंत:करणाने साहेबजी तुम्हाला अलविदा करतेय! टाटा – बाय बाय !!
खूप जड अंत:करणाने साहेबजी तुम्हाला अलविदा करतेय! टाटा – बाय बाय !!-माजी महापौर ॲड निर्मलाताई सामंत- प्रभावळकर
मुंबई:- मुंबईच्या माजी महापौर, महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा, जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या ॲड. निर्मलाताई सामंत- प्रभावळकर यांनी शोकसंदेशात उद्योगपती रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
शोकसंदेशात त्या रतन टाटा यांना उद्देशून म्हणतात की, साहेब, शब्द अपूरे पडतील असे ऋणानुबंध आमच्याशी जपलात, आमच्याशी प्रेमळपणे वागलात व आम्हा सर्वांना जीवन कसे जगायचे? त्याचा आदर्श घालून दिलात. १९९४ ला मी मुंबईची महापौर असताना कुलाबा येथील ताज हॉटेलला तुम्ही स्वतः व आयर्न लेडी मार्गारेट थॅचर (माजी ब्रिटीश पंतप्रधान), तात्कालिन खासदार आदरणीय मुरली देवरा जी यांच्या समवेत घालवलेली संध्याकाळ व केलेले स्नेहभोजन आजही स्मरणात आहे. तुम्ही दिलेला समाजसेवेचा आदर्श हीच माझ्या जीवनाची प्रेरणा आहे. once again Sir, टाटा बाय बाय!!!