सिंधुदुर्गातील ह्युमन राईट असो. फॉर प्रोटेक्शनचे परीक्षा केंद्रावर जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन आणि तयारी!
सिंधुदुर्ग:- आजपासून बारावीच्या परीक्षा सुरु होत असून त्यानंतर दहावीच्याच्याही परीक्षा सुरु होणार आहेत; परंतु अद्यापही एसटीचा संप सुरु असल्याने परीक्षा केंद्रापर्यंत पोहचायचे कसे? असा मोठा गंभीर प्रश्न ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला असून त्यासाठी सिंधुदुर्गात ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ह्या संघटनेने वाहनधारकांना आवाहन करून विद्यार्थ्यांच्या सहकार्यासाठी तयारी दर्शवली आहे.
सिंधुदुर्गात ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे जिल्हाध्यक्ष संतोष नाईक प्रसिद्धीपत्रकात म्हणतात की, एसटीचा संप सुरु असून दहावी बारावीच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहचायचे असल्यास खाजगी वाहनांचा वापर करावा लागणार. मात्र ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे अशा कुटुंबातील विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे वाहन धारकांनी सामाजिक बांधिलकी जपून अशा विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचवावे. अनेक विद्यार्थी परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी गाड्यांची वाट पाहत असल्यास त्यांना वाहन धारकांनी सहकार्य करावे!
खाजगी वाहन चालक मालकांना असे नम्र आवाहन करताना काही विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहचण्यास अडचण असल्यास त्यांनी तालुका अध्यक्षांना संपर्क साधावा, असे जिल्हाध्यक्ष संतोष नाईक यांनी कळविले आहे.
सिंधुदुर्गातील ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे तालुकाध्यक्ष आणि त्यांचे संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे…
कणकवली- हनिफभाई पिरखान 9422381159
मालवण- सुधीर धुरी 9423684545
देवगड- बाळा धुपकर 9421146125
वैभववाडी- प्रकाश नारकर 93263204 65- संजय सावंत 9422423342
कुडाळ- डॉ. अरूण गोडकर 9175142027
सावंतवाडी- मोहीनी मडगांवकर 9423220138
वेंगुर्ला- डॉ. आर. एम. परब 9422379069
सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष – संतोष नाईक 9405288188 / 9146288188