सिंधुदुर्गात कोरोनाचा चढता आलेख- आज २८० व्यक्तींना कोरोनाची लागण तर तिघांचा मृत्यू
सिंधुदुर्गनगरी (संतोष नाईक):- जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ६ हजार ९३४ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार ८१८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी २८० व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण १४/०४/२०२१ (दुपारी १२ वाजेपर्यंत)
आजचे नवीन पॉजिटीव्ह रुग्ण:- २८०
सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण:- १,८१८
सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेले रुग्ण:- ६
आज अखेर बरे झालेले रुग्ण:- ६,९३४
आज अखेर मृत झालेले रुग्ण:- २०१
आजपर्यंतचे एकूण पॉजिटीव्ह रुग्ण:- ८,९५६
पॉजिटीव्हपैकी चिंताजनक रुग्ण:- ७५
टेस्ट रिपोर्ट्स (फेर तपासणीसह)
आर.टी.पी.सी.आर आणि truenat टेस्ट
तपासलेले नमुने आजचे १३५८, एकूण- ५२,७९१, पैकी पॉजिटीव्ह आलेले- ६,२१९
अॅन्टिजन टेस्ट तपासलेले नमुने आजचे- १०२, एकूण ३२,२७८ पैकी पॉजिटीव्ह आलेले- २,८२६
पॉजिटीव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात असलेले-७५ यापैकी ऑक्सिजनवर असणारे -६०, व्हेंटिलेटरवर असणारे-१५
आजचे कोरोना मुक्त- २८
मु. पो. शिरोडा ता. वेंगुर्ला येथील ६८ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मु. पो. माणगांव, ता. कुडाळ येथील ७३ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तिला उच्च रक्तदाबाचा त्रास होता. मु. पो. वरगाव ता. वैभववाडी येथील ५७ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याला सारीचा आजार होता.
जिल्ह्यातील जनतेला घरीच सुरक्षीत राहून वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत उपचारावर सल्लामसलत करण्यात यावे यासाठी ई- संजीवनी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत सध्य स्थितीत ९५ लोकांनी लाभ घेतला आहे. नागरिकांनी ई – संजीवनी ओपीडीचा लाभ घ्यावा; असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आहे.
तालुका निहाय पॉजिटीव्ह रुग्णांमध्ये तसेच मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये गेल्या ४८ तासातील रुग्णांचा समावेश आहे . तर आजच्या नवीन पॉजिटीव्ह रुग्णांमध्ये गेल्या २४ तासात नव्याने आढळलेल्या रुग्णांचा समावेश आहे . सदरची आकडेवारी ही आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आलेली आहे.