महाराष्ट्र वितरक सेनेच्या वतीने पूरग्रस्तांना मदत
मुंबई:- नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे कोकणातील महाड, चिपळूण या तालुक्यातील अनेक गावेच्या गावे उद्ध्वस्त झाली. अशा प्रसंगी कर्तव्याच्या भावनेने शिवसेनाप्रणीत महाराष्ट्र वितरक सेनेच्या वतीने गुरुवार दि. १२ ऑगस्ट, २०२१ रोजी महाड तालुक्यातील काळीज गावातील पूरग्रस्तांना स्थानिक शिवसेना आमदार भरतशेठ गोगावले व महाराष्ट्र वितरक सेनेचे अध्यक्ष मारुती साळुखे यांच्या हस्ते जीवनाश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. तसेच पुरामुळे रोगराई पसरुन अनेक ग्रामस्थ आजारी असल्याने डॉक्टरांमार्फत पूरग्रस्तांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय तपासणीमध्ये २१९ पूरग्रस्तांची तपासणी करुन औषधांचेही वाटप करण्यात आले.
तद्प्रसंगी स्थानिक शिवसेनेचे जिल्हापरिषद सदस्य मनोज काळीजकर, महाराष्ट्र वितरक सेनेचे सरचिटणीस दिलीप बाम्हणे, डॉ.योगेश पाटील, अरविंद नाईक, विलास कारेकर, अमित माथूर तसेच स्थानिक शिवसेनेचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.