एस. एम. हायस्कूलच्या पालव सरांचे दुःखद निधन!

कणकवली:- कणकवलीतील एस. एम. हायस्कूलचे एमसीव्हीसीचे इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीचे शिक्षक श्री. अनिल बाबुराव पालव यांचे अल्पशा आजारामुळे ५७ व्य वर्षी दुःखद निधन झाले. गेले काही दिवस त्यांच्यावर रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान गुरुवारी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची बातमी समजताच अतिशय शांत, संयमी आणि हरहुन्नरी व्यक्तिमत्व हरपल्याची भावना एस. एम. हायस्कूलच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे.

कै. अनिल पालव यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगी आणि एक मुलगा असा परिवार आहे.

कै. अनिल पालव यांचे मूळ गाव जिल्ह्यात कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथे असून ते नोकरी निमित्त कणकवली तालुक्यातील हुंबरट-बेळणे येथे वास्तव्यास होते. तसेच ते सेवानिवृत्त होण्यास फक्त नऊ महिने बाकी होते.