लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी केंद्र सरकारने जादा डोस द्यावेत! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई:- लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी केंद्र सरकारने जादा डोस द्यावेत. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर ह्या सर्वाधिक संसर्ग असलेल्या ६ जिल्ह्यांसाठी केवळ ३ आठवड्यात ४५ वर्षापुढील सर्वांना लस देण्याची आमची तयारी आहे. याकरिता दीड कोटी डोस मिळावेत. तरुणांना कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर विळखा पडला असून त्यांना संसर्गापासून वाचविणे आवश्यक आहे. त्यामुळे २५ वर्षापुढील सर्वांना प्रतिबंधात्मक लस देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे विनंती केली आहे. ब्रेक दि चेनच्या माध्यमातून सुरु असलेल्या कामकाजाची माहिती देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही माहिती दिली.