‘फिट इंडिया मूव्हमेंट’ अंतर्गत सामान्य ज्ञान चाचणीचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी (जिमाका):- केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी क्रीडा विषयक सामान्य ज्ञान चाचणी Quiz 3 चे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची नोंदणी 5 सप्टेंबर 2023 पासून सुरु झाली असून 5 ऑक्टोंबर 2023 ही नोंदणी करण्यासाठीची शेवटची तारीख आहे. सर्व शाळा व विद्यार्थी https://fitindia.nta.ac.in या कार्यालयीन वेबसाईटवर नोंदणी करु शकतात. बक्षीसाची रक्कम मागील वर्षासारखीच आहे.

केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय यांच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी क्रीडाविषयक सामान्य ज्ञान चाचणीचे Quiz चे आयोजन सन 2019 पासून करण्यात येत आहे. सन 2022 मध्ये Fit india Quiz2 चे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना खेळाविषयक असलेले ज्ञान कौशल्य इ. साठी व्यासपीठ उपलब्ध करुन देणे, भारतीय खेळांचा समृध्द इतिहास, स्थानिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळ भारतीय खेळाडू इ. बाबत विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृती निर्माण करणे या चाचणीचा प्रमुख उद्देश आहे.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केली आहे.

You cannot copy content of this page