सूक्ष्म व लघू उद्योजकांनी जिल्हा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी (जिमाका) जिल्ह्यातील सूक्ष्म व लघू उद्योजकांनी जिल्हा पुरस्कार योजनेसाठी दि. 31 ऑक्टोंबर 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे, आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एस.एस. दामले यांनी केले आहे.

जिल्ह्यातील यशस्वी उद्योजकांच्या मेहनतीचे, चिकाटीचे व जिद्दीचे कौतुक करण्याच्या हेतून जिल्हा स्तरावर उत्कृष्ट सूक्ष्म व लघु उद्योजकांसाठी जिल्हा पुरस्कार योजना 1985 पासून कार्यान्वित केली आहे. या योजनेंतर्गंत प्रथम पुरस्कार विजेत्यास रोख रु. 15 हजार आणि व्दितीय पुरस्कार विजेत्यास रोख रु. 10 हजार सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन समारंभपूर्वक गौरविण्यात येते.

या योजनेंतर्गंत 2023 च्या पुरस्कारांसाठी अर्ज करण्यासाठी सर्वसाधारण पात्रतेच्या अटी पुढीलप्रमाणे आहेत. अर्जदार घटक या जिल्ह्यातील दि. 1/1/2020 रोजी किंवा त्यापुर्विचा स्थायी लघू उद्योजक नोंदणीकृत, पार्ट-2 ज्ञापन स्वीकृतीधारक घटक असावा, मागील दोन वर्षे सलग उत्पादनात असावा, कोणत्याही बँकेचा अथवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा, राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीय अथवा जिल्हा पुरस्कार मिळालेला नसावा, निर्याताभिमुख घटक, महिला उद्योजक, मागासवर्गीय उद्योजक यांना प्राधान्य.विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा उद्योग केंद्र सिंधुदुर्ग येथे उपलब्ध आहेत.

You cannot copy content of this page