महाराष्ट्र राज्य सहकारी संघ निवडणुकीत सहकार पॅनेलचा दणदणीत विजय!
१०६ वर्षांच्या परंपरेच्या संघात २१ पैकी २० जागांवर सहकार पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व
आ. प्रवीण दरेकर, संजीव कुसाळकर आणि शिवाजीराव नलावडे यांच्या नेतृत्वाखाली भव्य यश!
मुंबई (मोहन सावंत) :- महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीत आ. प्रवीण दरेकर, संजय कुसाळकर व शिवाजीराव नलावडे यांच्या नेतृत्वाखालील १०६ वर्षांच्या परंपरेच्या संघात सहकार पॅनेलने २१ पैकी २० जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळविले.
“संघाला ऊर्जितावस्था आणून राज्यातील सहकारी संस्था व कार्यकर्त्यांना शिक्षण प्रशिक्षण देण्याचे काम नवनियुक्त संचालक मंडळ नेटाने करील!” असा विश्वास या विजयानंतर बोलताना आ. प्रवीण दरेकर यांनी दिला. याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांचे आभार आ. प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले.