कॉस्मोपॉलीटन सोसायटी असोशिएशनच्या सभादसदांची आमदार डाॅ. भारती लव्हेकर यांची सदिच्छा भेट!
आमदार डाॅ. भारती लव्हेकर यांचा सोसायटीमधील कामाबाबत असोशिएशनला सकारात्मक प्रतिसाद!
मुंबई:- कॉस्मोपॉलीटन को. ऑ. हौ. सोसायटी असोशिएशनच्या सर्व पदाधिकारी व सभादसदांनी आमदार डाॅ. भारती लव्हेकर यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले आणि सोसायटीमध्ये आमदार फंडातून सुरु असलेल्या व भविष्यात सुरु करायच्या कामाबाबत सविस्तर चर्चा केली. त्यावेळी आमदार डाॅ. भारती लव्हेकर यांनी उपस्थितांचे आभार मानून पुढील कामाबाबत कॉस्मोपॉलीटन को. ऑ. हौ. सोसायटी असोशिएशनला सकारात्मक प्रतिसाद दिला.
कॉस्मोपॉलीटन को. ऑ. हौ. सोसायटी असोशिएशनच्या सर्व पदाधिकारी व सभादसदांनी २० नोव्हेंबरला २०१९ रोजी सायंकाळी सन्मानिय लोकप्रिय आमदार डाॅ. भारती लव्हेकर यांची सदिच्छा भेट घेतली आणि त्यांचे अभिनंदन केले. त्यावेळी सोसायटीमध्ये आमदार फंडातून सुरु असलेल्या, भविष्यात सुरु करायच्या कामाबाबत तसेच सोसायटीमधील गार्डन सुशोभिकरण ,फ्लोरिंग दुरूस्ती बाबत इत्यादि समस्यावर चर्चा झाली. त्यावेळी आमदार डाॅ. भारती लव्हेकर यांनी उपस्थितांचे आभार मानून प्रत्येकाच्या भावना जाणून घेतल्या. तसेच पुढील कामाबाबत कॉस्मोपॉलीटन को. ऑ. हौ. सोसायटी असोशिएशनला सकारात्मक प्रतिसाद दिला. उर्वरित कामे आमदार फंडातून करून देण्याचे आश्वासन यावेळी आमदारांनी दिले.
त्यावेळी कॉस्मोपॉलीटन को. ऑ. हौ. सोसायटी असोशिएशनचे सरचिटणीस मोहन सावंत, चेतन नाईक, साबेरा उस्मान, मुक्तार अहमद शेख, शारदा तोरसकर, जुम्मा विश्वास, मुमताझ इक्रमी, मंजू गुप्ता, विजय बुरघाटे, प्रकाश सोनाळकर, वॉल्टर डिमेलो, मुनीरजी काझी, विष्णु भट आणि पत्रकार नरेंद्र हडकर उपस्थित होते.