नगरसेवक राजू श्रीपाद पेडणेकर यांनी केलेल्या विकास कामांचा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा
ओशिवरा अब्दुल कलाम आझाद उद्यान, बृहन्मुंबई पालिका क्रीडांगण तसेच प्रतिक्षा नगर येथील मुंबई पब्लिक स्कूल (सी.बी.एस.ई.बोर्ड) इत्यादी विकास कामांचा लोकार्पण सोहळा
मुंबई (मोहन सावंत):- जोगेश्वरी येथील ओशिवरा अबुल कलाम आझाद उद्यान, बृहन्मुंबई पालिका क्रीडांगण तसेच प्रतिक्षा नगर येथील मुंबई पब्लिक स्कूल (सी.बी.एस.ई.बोर्ड) इत्यादी विकास कामांचा लोकार्पण सोहळा पर्यटनमंत्री, पर्यावरणमंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्यजी ठाकरे यांच्या हस्ते ५ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता होणार असून त्यावेळी संसदीयकार्य-परिवहनमंत्री श्री. अनिल परब, मुंबईच्या महापौर सौ. किशोरीताई पेडणेकर, शिवसेना नेते खासदार श्री. गजानन किर्तीकर, आरोग्य समिती (म. न. पा.) अध्यक्षा- श्रीमती राजुलताई पटेल, शिक्षण समिती (म. न. पा.) अध्यक्षा- सौ.संध्या दोशी, बाजार व उद्यान समिती (म. न. पा) अध्यक्षा- सौ.प्रतीमाताई खोपडे उपस्थित राहणार आहेत.
नगरसेवक, शिवसेना उपविभागप्रमुख राजू श्रीपाद पेडणेकर यांनी आपल्या प्रभाग क्रमांक ६२ मध्ये आजपर्यंत अनेक विकास कामांची पूर्तता करून वचनपूर्ती केली आहे. उद्या त्याच प्रभागातील ओशिवरा अब्दुल कलाम आझाद उद्यान आणि बृहन्मुंबई पालिका क्रीडांगण तसेच प्रतिक्षा नगर येथील मुंबई पब्लिक स्कूल (सी.बी.एस.ई.बोर्ड) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने विकसित करून नगरसेवक राजू पेडणेकर यांनी जनतेला उपयुक्त अशी भेट दिली आहे.