ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन कणकवलीच्या अध्यक्षपदी हनिफभाई पिरखान

कणकवली:- ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेची कणकवली तालुका नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून अध्यक्षपदी हनिफभाई पिरखान यांची तर सचिव म्हणून मनोजकुमार वारे यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली.

ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन कणकवली तालुका नूतन कार्यकारिणीची निवड राष्ट्रीय अध्यक्ष एम.डी.चौधरी व महाराष्ट्र राज्य निरीक्षक घनश्याम सांडीम यांच्या मार्गदर्शनानुसार सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष नाईक व जिल्हा निरीक्षक मनोज तोरस्कर यांनी कणकवली तालुका कार्यकारणीची निवड २६ जानेवारी २०२२ रोजी जाहीर केली.

कणकवली तालुका प्रसिद्धी प्रमुख- श्रेयश कदम

 

कणकवली तालुका अध्यक्ष हनिफभाई पिरखान, उपाध्यक्ष- राजेश जाधव, उपाध्यक्ष- संदेश बांदेकर, सचिव- मनोज कुमार वारे, खजिनदार- रुपेश खाड्ये, संघटक- ऋषिकेश (दादा) कोरडे, जनसंपर्क अधिकारी- प्रवीण गायकवाड, कणकवली तालुका प्रसिद्धीप्रमुख- पत्रकार श्रेयश कदम, सल्लागार रत्नाकर देसाई व चंद्रशेखर उपरकर अशी नवीन कार्यकारणी जाहीर केली. सदर कार्यकारणीचा कार्यकाल जानेवारी २०२२ ते डिसेंबर २०२२ पर्यंत असणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष नाईक व जिल्हा निरीक्षक मनोज तोरस्कर यांनी नुतन कार्यकारीणी पदाधिकाऱ्यांचे विशेष अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page