कोविड महामारीच्या काळातील थकित वीजबिलात सवलत देण्याची मागणी

ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे निवेदन

मालवण:- कोव्हीड १९ च्या काळात थकित राहिलेल्या मालवण तालुक्यातील वीज ग्राहकांना वीजबिलात सवलत देण्यात यावी; अशी आग्रही मागणी ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेचे मालवण तालुकाध्यक्ष सुधीर धुरी, मालवण तालुका कार्याध्यक्ष सुभाष प्रभुखानोलकर, जिल्हा सचिव किशोर नाचणोलकर यांनी म. रा. विद्युत वितरण कं. उपविभाग मालवणचे उपअभियंता यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

कोविड महामारीच्या काळात सर्व उद्योग, व्यवसाय ठप्प होते. गेल्या दोन तीन महिन्यापासून सर्व व्यवसाय सुरळीत होत असताना आता पुन्हा कोव्हीडचे सत्र सुरू झाले आहे. त्यामुळे मालवण तालुक्यातील काही वीज ग्राहकांची वीजबील थकबाकी राहिलेली आहे. त्या ग्राहकांची काही रक्कम भरणा करुन घेऊन उर्वरित थकीत रक्कम सवलतीने भरणा करण्यासाठी मुभा देण्यात यावी. त्याचबरोबर वीजबीले भरण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांसाठी व जेष्ठ नागरिकांसाठी उन्हाळ्यात उन्हाचा त्रास होतो. वीज ग्राहकांना सावलीसाठी शेड उभारण्यात यावी. सदरच्या दोन्ही मागण्यांची तातडीने पूर्तता करण्यात यावी, अन्यथा संघटनेला योग्य निर्णय घ्यावा लागेल; असा इशारा ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेच्या मालवण तालुका शाखेच्यावतीने देण्यात आला आहे.

You cannot copy content of this page