सासऱ्याने काळ्या पैशाचे पांढरे करून देण्यासाठी उपनिबंधक बी. एस. कटरे करायचा पत्नीचा छळ!

महिन्याला कटरे याची सुमारे ४० लाख रुपये काळी कमाई?

तक्रारी अर्जावर कार्यवाही करताना जो अधिक रक्कम देईल त्याच्या बाजूने निकाल देण्याची कटरेची कार्यप्रणाली!

नागरिकांच्या अनेक तक्रारी व विनंती निवेदनं दुर्लक्षित!

त्याने केलेल्या कामकाजाची उच्चस्तरीय चौकशी आवश्यक!

मुंबई (प्रतिनिधी):- म्हाडाचे उपनिबंधक बी. एस. कटरे याला शिक्षिका पत्नी रेणू हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आली असून ८ तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या व २० लाख रुपये घेऊनही हुंड्यासाठी आणि सासऱ्याने काळ्या पैशाचे पांढरे करून देण्यासाठी कटरे पत्नीचा छळ करायचा! असा आरोप आत्महत्या केलेल्या रेणूच्या माहेरच्यांनी केला आहे.

सहकारी संस्था, मुंबई पश्चिम उपनगरे, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण, म्हाडा, बांद्रा पूर्व, मुंबई ह्या ठिकाणी उपनिबंधक पदावर बी. एस. कटरे उर्फ बापू शिवाजी कटरे कार्यरत आहे. ह्या ठिकाणी आपल्या पदाचा गैरवापर करून कटरे महिन्याला सुमारे ४० लाख रुपये काळी कमाई करीत होता. सदर काळी कमाई पांढरी करण्यासाठी आपल्याला सासऱ्याने गुपचूप सहकार्य करावे; अशी कटरे ह्याची मागणी असायची. परंतु ह्यास पत्नी रेणू हिचा विरोध असायचा. `अशाप्रकारे काळी रक्कम जमा करून आपण आपले व आपल्या मुलांचे भविष्य खराब करायचे नाही. ह्याचे आपल्याला दुष्परिणाम भोगावे लागतील;’ असं पत्नी रेणू म्हणायची. हा विरोध कटरे ह्याला सहन व्हायचा नाही. आपली पत्नी आपल्याला काळे पैसे पांढरे करण्याच्या कामात अडथळा आणते; ह्या रागापोटी कटरे हा आपल्या पत्नीला मारहाण करायचा, काठीने मारायचा. तिला वाट्टेल तसं बोलायचा. अपमानित करायचा. शेवटी तिने आत्महत्या करून ह्यातून सुटका करून घेतली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा रेणूचा भाऊ सचिन शेजाळ यांनी पोलिसांकडे दिलेल्या सविस्तर तक्रारीवरून दाखल केला असून कटरे ह्याला अटक झाली आहे.

जो अधिक रक्कम देईल त्याच्या बाजूने निकाल देण्याची कटरेची कार्यप्रणाली!

उपनिबंधक म्हणून कटरे यांच्याकडे अनेक अर्ज निवेदनं यायची. त्यावर दखल घेण्याची तसदी कटरे घ्यायचा नाही. ज्या तक्रारी निवेदनातून काळे पैसे मिळतील त्यावर कार्यवाही सुरू करायची आणि तक्रारी अर्जावर कार्यवाही करताना जो अधिक रक्कम देईल त्याच्या बाजूने निकाल देण्याची कटरेची कार्यप्रणाली होती. ह्यातून तो महिन्याला सुमारे ४० लाख काळी कमाई कमवायचा. ह्यासाठी त्यांच्या कार्यालयातील ठराविक सहकारी त्यांना सहकार्य करायचे. असा आरोप अनेक नागरिकांनी केला असून संबंधितांवर योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

उपनिबंधक बी. एस. कटरे याच्या कार्यालयीन कामकाजाची सखोल चौकशी आवश्यक!

कटरे याच्या संपत्तीची आणि कामकाजाची सखोल चौकशी केली जावी; अशी मागणी अनेक अन्यायग्रस्त हाऊसिंग सोसायटीच्या सभासदांनी – पदाधिकाऱ्यांनी केली आहे. ह्या पदावर येण्यासाठी आपण वरिष्ठांना लाखो रुपये दिले आहेत; त्यामुळे आपले कोणी वाकडे करू शकणार नाही; अशी त्यांची देहबोली होती. त्यामुळे शासनाने ह्या प्रकरणी सखोल चौकशी करावी; अशीही मागणी पुढे येत आहे. जर योग्य कारवाई झाली नाही तर काही सामाजिक कार्यकर्ते आंदोलनाच्या तयारीत असल्याचे समजते.

error: Content is protected !!