जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे विकास महाविद्यालयात आयोजन
मुंबई:- विक्रोळी पूर्व मधील विकास महाविद्यालयात महाराष्ट्र ललित अकादमीच्या माध्यमातून जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन शनिवार दि. ४ जानेवारी २०२४ रोजी करण्यात आलेले आहे.
जिल्ह्यातील लहानग्या चित्रकारापासून ते मोठ्या चित्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांना अनुकूल असे
पोषक वातावरण निर्मितीसाठी महाराष्ट्र ललित कला अकादमीच्या माध्यमातून जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त चित्रकारांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
ह्या स्पर्धेत शिशु वर्गापासून ते खुल्या गटापर्यंत सर्वजण प्रवेश करू शकतात. शिशु वर्ग ते बारावीच्या विध्यार्थ्यांना रु.५० व पुढील खुल्या गटातील सर्वाना रु.१०० असे प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे.