`तिमिरातूनी तेजाकडे’ ह्या सामाजिक संस्थेची शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव घडविण्यासाठी शैक्षणिक चळवळ!

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी):- उच्च विद्याविभूषित, शिक्षणतज्ञ, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र व मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार विभागात कनिष्ठ अनुवाद अधिकारी पदावर कार्यरत असणारे श्री. सत्यवान यशवंत रेडकर, निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा व्याख्यानांचे अर्धशतक पूर्ण केल्यानंतर रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी पुन्हा १८ ते २४ डिसेंबर २०२१ च्या दरम्यान निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा व्याख्यानमाला घेणार आहेत. सदर व्याख्यानांसाठी कोणतेही रजिस्ट्रेशन शुल्क असणार नाही; तसेच श्री. रेडकर सर व्याख्यानासाठी कोणतेही मानधन घेत नाहीत.

रत्नागिरी शहर-
१) आर. बी. शिर्के हायस्कूल, माळनाका, रत्नागिरी, शनिवार दिनांक १८/१२/२०२१, सकाळी: ९.०० वाजता

२) सौ. गोदुताई जांभेकर विद्यालय, एस.टी स्टॅन्ड समोर, रत्नागिरी, शनिवार दिनांक १८/१२/२०२१, दुपारी २.०० वाजता

राजापूर तालुका-
३) वि. सी. गुर्जर, विद्यामंदिर व ज्युनि. कॉलेज ऑफ आर्टस एण्ड कॉमर्स, कशेळी, रविवार दिनांक १९.१२.२०२१ सकाळी ९.०० वाजता

४) श्री. महाकाली इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आडिवरे, रविवार दिनांक १९.१२.२०२१, दुपारी: १.०० वाजता

५) युवक विकास मंडळ संचालित कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, भालावली, सोमवार, दिनांक २०.१२.२०२१, सकाळी: ९.०० वाजता

६) नाटे नगर विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, नाटे, सोमवार, दिनांक २०.१२.२०२१ दुपारी: १.०० वाजता

७) न्यू इंग्लिश स्कूल व श्रीमती स्नेहलता रामचंद्र मांजरेकर कनिष्ठ महाविद्यालय, जैतापूर, मंगळवार, दिनांक २१.१२.२०२१, सकाळी ९.०० वाजता

८) साने गुरुजी विद्यामंदिर आणि प्रकाश भिकाजीराव चव्हाण आर्टस् व कॉमर्स (संयुक्त) कनिष्ठ महाविद्यालय, जानशी, मंगळवार, दिनांक २१.१२.२०२१, दुपारी: १.०० वाजता

देवगड तालुका-
९) शेठ म. ग. हायस्कूल देवगड, बुधवार, दिनांक २२.१२.२०२१, सकाळी: ८.०० वाजता

कणकवली तालुका-
१०) पूर्ण प्राथमिक शाळा, सावडाव नं. १, कणकवली, बुधवार, दिनांक २२.१२.२०२१, दुपारी १२.०० वाजता

सावंतवाडी तालुका-
११) आंबोली पब्लिक स्कूल, आंबोली, गुरूवार, दिनांक २३.१२.२०२१, सकाळी ९.०० वाजता

१२) श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय, असनिये, गुरूवार, दिनांक २३.१२.२०२१, दुपारी १.०० वाजता

१३) महात्मा गांधी विद्यामंदिर हायस्कूल, सातार्डा, शुक्रबार, दिनांक २४.१२.२०२१, सकाळी: ९.०० वाजता

१४) बांदा ग्रामपंचायत सभागृह, खेमराज मेमोरियल इंग्लिश शाळेच्या बाजूला, शुक्रबार, दिनांक २४.१२.२०२१, दुपारी: १.०० वाजता

शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव घडविण्यासाठी ही शैक्षणिक चळवळ आहे. जास्तीत जास्त रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी या निःशुल्क मार्गदर्शन व्याख्यानांचा लाभ घ्यावा; असे आवाहन तिमिरातुनी तेजाकडे या नोंदणीकृत सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री. सचिन यशवंत रेडकर (मो. ९७६८७३८५५४ ९९६९६५७८२०) यांनी केले आहे.

You cannot copy content of this page