माळगाव जिल्हा बँकेच्या शाखेमध्ये एटीएम मशीन बसविण्याबाबत ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे निवेदन
मालवण (प्रतिनिधी):- माळगाव जिल्हा बँकेच्या शाखेमध्ये एटीएम मशीन बसविण्याबाबत शाखेचे शाखाधिकारी श्री. मांजरेकर आणि कर्मचारी सौ. साळसकर मॅडम यांना ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे मालवण तालुका उपाध्यक्ष श्री. राजेशकुमार लब्दे आणि मालवण तालुका खजिनदार श्री.राजेंद्र सावंत यांनी निवेदन सादर केले. यावेळी बँक इमारत मालक श्री.मंगेश खोत आणि ग्रामस्थ श्री. रोहित हडकर उपस्थित होते.
याबाबत शाखाधिकारी यांनी सदर निवेदन पुढील कार्यवाहीसाठी बँकेच्या मुख्य कार्यालयाला पाठविण्यात येईल; असे आश्वासन दिले.