‘भाजयुमो’चे ‘एक सही भविष्यासाठी’ अभियान

मुंबई (ॲड. सुमित शिंगाणे यांजकडून):- भारतीय जनता युवा मोर्चातर्फे सोमवारपासून मुंबईतील सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थी आणि युवकांशी संवाद साधणारे ‘एक सही भविष्यासाठी’ हे अभियान सुरू झाले. मोदी सरकारने विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी जे काम केले आहे, ते त्यांच्यासमोर मांडण्यात येणार आहे. नवीन आयआयएम मुंबईला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. मुंबईतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, पवईला (नीटी) आयआयएमची मान्यता मिळाली आहे. त्यामुळे तरुणांना आता अन्य राज्यांत जाण्याची गरज नाही. मुंबईत एमबीएच्या ३५० जागा घेऊन आयआयएम सुरू करण्यात येणार आहे. यंदापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सुरू होणार असून, त्यात रोजगाराशी संबंधित अभ्यासक्रम असतील. स्वाक्षरी अभियानातून आयआयएमची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. अगोदरच्या सरकारच्या काळातील एम्सपेक्षा २१४ टक्के वाढ मोदी सरकारमध्ये झाली आहे. मेडिकलच्या पदव्युत्तर जागांत ९३ टक्के वाढ झाली आहे. या सर्व बाबी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत. मेडिकल पदवीसंबंधी जागा ७५ टक्के वाढल्या आहेत. सात नवीन आयआयटी, आठ नवीन आयआयएम सुरू होणार आहेत. या सर्व योजना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘एक सही भविष्यासाठी’ हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून गोरेगावचे आमदार विद्याताई ठाकुर यांच्या मार्गदर्शनाने आणि भाजयुमो मुंबई अध्यक्ष तजेंदरसिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच एक स्वाक्षरी भविष्यासाठी मोहीम विवेक महाविद्यालय, गोरेगाव पश्चिम येथे राबविण्यात आली. यावेळी मिलिंद वाडेकर (सरचिटणीस-भाजयुमो, मुंबई), सचिन भिलारे (अध्यक्ष- भाजयुमो उ/प जिल्हा), अमेय मोरे (अध्यक्ष-गोरेगाव विधानसभा), आजेश हेगडे (उपाध्यक्ष-भाजयुमो, मुंबई), जयेश येवगे (महामंत्री, भाजयुमो गोरेगाव), रमाकांत यादव( महामंत्री, गोरेगाव) आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. या उपक्रमाबाबत विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.