माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी यांनी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी(जि.मा.का.):- जिल्ह्यातील सर्व सेवानिवृत्त अधिकारी, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, वीरनारी, यांना कळविण्यात येते की, ज्यांच्या नोंदणी या कार्यालयाच्या रोजगार पटावर आहेत, त्यांनी सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दिलेल्या www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेस्थळावर जाऊन त्यांची माहिती भरावयाची (Online Registration) आहे. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे.

सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील विविध जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातुन माजी सैनिक/ माजी सैनिक विधवा पत्नी यांना देण्यात येणान्या विविध आर्थिक मदती व इतर कामकाज हे दिनांक १ एप्रिल २०२५ पासून ऑनलाईन (Online) पध्दतीने सुरू करण्यात येणार आहे.

कार्यालयाने पुढीलप्रमाणे सायबर कॅफे यांच्याशी चर्चा करुन नोंदणी प्रक्रियेचे दर निश्चित केले आहेत. तरी Online Registration करीता खालील व्यक्तींकडे संपर्क साधुन लवकरात लवकर नोंदणी करुन घ्यावयाची आहे.तालुका, नाव, मोबाईल नंबर पुढीलप्रमाणे:
१. सावंतवाडी- किरण सावंत (कोलगांव), मोबाईल- 8437562984
२. सांवतवाडी- शबनम कॉम्पुटर (केसरकर कॉम्लेक्स), कबीर शेख, मोबाईल- 9970074034
३. दोडामार्ग- श्रीकांत उसपकर, मोबाईल- 8805274390
४.ओरोस सिंधदुर्गनगरी, कुडाळ- समर्थ कॉम्पुटर, मंदार शेजवलकर, मोबाईल- 8087870669, 8779240837

 

तसेच नोंदणी केल्यानंतर त्याबाबतचा भरलेला फॉर्म प्रत्यक्ष येऊन जिल्हा सैनिक कार्यालय, सिंधुदुर्ग येथे जमा करुन त्याबाबतची खात्री करावी. ज्या माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी यांचे ओळखपत्र खुपच खराब अथवा वापरण्यास योग्य नाही, त्यांना नवीन ओळखपत्र त्वरीत दिले जाईल व उर्वरीत नोंदणी केलेल्या माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी यांना नवीन ओळखपत्र केंद्रिय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्याकडुन प्राप्त झाल्यावर दिले जाईल, याची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्र. ०२३६२-२२८८२०/९३२२०५१२८४ वर संपर्क करावा.