केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार- १५ कॅबिनेट व २८ राज्यमंत्र्यांना शपथ
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, भाजपचे नेते नारायण राणे यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी
नवीदिल्ली:- अनेक दिवसापासून चर्चेत असलेला मोदी सरकारचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आज झाला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, भाजपचे नेते नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली आहे. तर महाराष्ट्रातील कपिल पाटील, भारती पवार आणि भागवत कराड यांना राज्यमंत्रीपद मिळालं आहे. एकूण १५ कॅबिनेट आणि २८ राज्यमंत्र्यांना शपथ देण्यात आली.
राष्ट्रपती भवनात ४३ मंत्र्यांचा शपथविधी झाला. यात महाराष्ट्रातील ४ नेत्यांचा समावेश आहे. मंत्रिमंडळात ३६ नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे. तर ७ विद्यामान मंत्र्यांना पुन्हा संधी दिली गेली आहे.
पुढील प्रमाणे १५ कॅबिनेट मंत्र्यांना शपथ देण्यात आली.
१. नारायण राणे
२. सर्वानंद सोनोवाल
३. विरेंद्र कुमार
४. ज्योतिरादित्य शिंदे
५. रामचंद्र प्रसाद सिंह
६. अश्विनी वैष्णव
७. पशुपती कुमार पारस
८. किरेन रिजीजू
९. राजकुमार सिंह
१०. हरदीप सिंग पुरी
११. मुकेश मांडवीय
१२. भुपेंद्र यादव
१३. पुरुषोत्तम रुपाला
१४. जी. किशन रेड्डी
१५. अनुराग सिंह ठाकूर
पुढील प्रमाणे २८ राज्यमंत्र्यांना शपथ देण्यात आली.
१. पंकज चौधरी
२. अनुप्रिया सिंह पटेल
३. सत्यपाल सिंह बघेल
४. राजीव चंद्रशेखर
५. शोभा करंदजले
६. भानु प्रताप सिंह वर्मा
७. दर्शना विक्रम जरदोश
८. मिनाक्षी लेखी
९. अन्नपूर्णा देवी
१०. ए. नारायणस्वामी
११. कुशाल किशोर
१२. अजय भट्ट
१३. बी. एल. वर्मा
१४. अजय कुमार
१५. चौहान देवुसिन्ह
१६. भगवंत खुबा
१७. कपिल मोरेश्वर पाटील
१८. प्रतिमा भौमिक
१९. सुभाष सरकार
२०. भागवत किशनराव कराड
२१. राजकुमार रंजन सिंह
२२. भारती प्रवीण पवार
२३. बिश्वेश्वर तुडू
२४. शंतनू ठाकूर
२५. मंजुपारा महेंद्रभाई
२६. जॉन बारला
२७. मुरूगन
२८. निसिथ प्रामाणिक
केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यापूर्वी खालील विद्यमान मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात आला.
१) कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद
२) सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत
३) मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियल निशंक
४) आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन
५) पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर
६) कामगार मंत्री संतोषकुमार गंगवार
७) राज्यमंत्री बाबुल सुप्रियो
८) मंत्री रतन लाल कटारीया
९) राज्यमंत्री प्रतापचंद्र सारंगी
१०) मंत्री संजय धोत्रे
११) मंत्री सुश्री देबश्री चौधरी
१२) कृषीमंत्री डि.व्ही. सदानंद गौडा