लोककलाकार पद्मश्री पुरस्कार विजेते परशुराम गंगावणे यांचा ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने सत्कार
कुडाळ (प्रतिनिधी):- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ जवळ पिंगुळी- गुढीपुर या छोट्याशा गावी गेल्या पाच दशकांहून अधिक आदिवासी लोककलांचे जतन आणि संवर्धन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी केले आहे. त्या कार्याच्या योगदानाची दखल घेऊन केंद्र सरकारने यावर्षीच्या सर्वोच्च असा पद्मश्री पुरस्कार देऊन राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव करण्यात आला. आंतरराष्ट्रीय मानव अधिकार या दिनाचे औचित्य साधून पद्मश्री परशुराम गंगावणे यांचा ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने शाल व श्रीफळ देऊन तसेच सन्मानपत्र देऊन समारंभपूर्वक गौरव करण्यात आला.
त्यावेळी उपस्थित सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष नाईक, जिल्हा निरीक्षक मनोज तोरस्कर, कणकवली तालुका कार्याध्यक्ष हनीफ भाई पिरखान, उपाध्यक्ष प्रकाश नारकर, सदस्य मनोज वारे, प्रवीण गायकवाड, मालवण तालुका खजिनदार रितेश सावंत, कुडाळ तालुका सदस्य विजय गावडे उपस्थित होते.