अप्पासाहेब पटवर्धन यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त गोपुरी आश्रमात विविध कार्यक्रमांचे आयोजन
कणकवली:- कोकण गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त गोपुरी आश्रमात दिनांक २ नोव्हेंबर ते ४ नोव्हेंबर दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
२ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते संध्याकाळी १० या वेळेत अप्पासाहेब पटवर्धन यांच्या सफाईच्या विचारांवर आधारित रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.०० ते १०.०० या वेळेत गोपुरी आश्रमात सफाईचा उपक्रम घेण्यात येणार आहे. सायंकाळी ३.०० ते ५.०० या वेळेत महाराष्ट्रातून कार्यक्रमाला उपस्थित `गांधी विचारांच्या मान्यवरांशी म.गांधी-अप्पासाहेब-विनोबा आणि प्रकाशभाई मोहाडीकर यांच्या विचारांची भविष्यकालीन पिढीसाठी उपयुक्तता’ यासंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे.
४ नोव्हेंबर रोजी सकाळी ठिक १०.३० ते दुपारी २.०० या वेळेत मुख्य कार्यक्रम होईल. यात अप्पासाहेब पटवर्धन यांच्या विचारांवर आधारित जिल्हास्तरिय निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम गोपुरी आश्रमाच्या कै.गणपतराव सावंत बहूऊद्देशिय प्रशिक्षण संकुलात ( नाईक पेट्रोल पंपाच्या मागे-वागदे येथे) होणार आहे. या कार्यक्रमात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस यांचे मार्गदर्शन होणार आहे.
या कार्यक्रमाच्या सांगतेनंतर विनोबा भावे यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त ‘गोपुरी ते पवनार’ गांधी-विनोबा-अप्पा-प्रकाशभाई विचार यात्रेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक, राजकिय क्षेत्रातील कार्यकर्ते,युवक युवती यांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी केले आहे.