कणकवलीचे माजी मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांचे दुःखद निधन

कणकवली (प्रतिनिधी):- कणकवली नगरपंचायतीचे माजी मुख्याधिकारी आणि डहाणू नगर परिषदेत मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांचे आज मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात निधन झाले. प्रामाणिक आणि कार्यक्षम अधिकाऱयाच्या जाण्याने अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे.

कणकवली नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी पदी त्यांनी दोन वेळा यशस्वी कार्यभार सांभाळला होता. त्यांनतर कणकवली येथून त्यांची डहाणू येथे बदली झाली होती. दोन वर्षापूर्वी झालेला कणकवली नगरपंचायत महोत्सव त्यांनी यशस्वी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली होती. त्यांच्या छोट्या कन्येनेही महोत्सवातील किड्स फॅशन शो मध्ये सहभाग घेतला होता.

त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे काही दिवसापूर्वी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी असा परिवार आहे.