जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी गणेश जेठे २२ मतांनी विजयी

सिंधुदुर्ग:- सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या चुरशीच्या ठरलेल्या व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच घटकांचे लक्ष लागून राहिलेल्या अध्यक्षपदी पदासाठी गणेश जेठे विजयी झाले आहेत. तर चंदू सामंत आणि संतोष वायंगणकर यांचा पराभव झाला आहे.

जिल्हा पत्रकार संघाच्या निवडणुकीत ३३१ पैकी एकूण ३२४ मतदान झाले होते. चंदू सामंत, गणेश जेठे व संतोष वायंगणकर हे तीन उमेदवार रिंगणात होते. यातील सामंत यांना ४७ मते, तर जेठे यांना १४९ मते व वायंगणकर यांना १२८ मते मिळाली. त्यामुळे गणेश जेठे २२ मतांनी विजयी झालेत. जिल्हा पत्रकार संघाच्या निवडणुकीचे सर्व निकाल जाहीर झाल्याने अध्यक्षपदी गणेश जेठे, उपाध्यक्ष रमेश जोगळे व उज्वल नारकर, सचिव उमेश तोरसकर, सहसचिव देवयानी वरसकर, खजिनदार संतोष सावंत हे उमेदवार विजयी झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *