सतरा वस्तू आणि सहा सेवांवर जीएसटी दरात कपात!
नवीदिल्ली:- ३१ व्या जीएसटी परिषद बैठकीत सतरा वस्तू आणि सहा सेवांवर जीएसटी दरात कपात करण्यात आली. सुधारित जीएसटी दर १ जानेवारी २०१९ पासून लागू होणार आहेत. बैठकीत घेण्यात आलेले निर्णय पत्रकार परिषदेत सांगताना अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ही घोषणा केली. त्यांनी जीएसटीचा २८ टक्क्यांचा कर टप्पा हळूहळू संपुष्टात येत असल्याचेही स्पष्ट केले. सदर जीएसटी कपातीतून सरकारला पाच हजार पाचशे कोटी रुपयांचा महसूल गमवावा लागणार आहे.
जीएसटी संदर्भात निवडक महत्वाचे निर्णय…
१) हवाबंद डब्यात गोठवून ठेवलेल्या ब्रॅण्डेड भाज्या आणि संरक्षित केलेल्या भाज्या (लगेच खाण्यायोग्य नसलेल्या) वरील ५ टक्के जीएसटी रद्द
२) अपंगांच्या व्हिलचेअरसह सर्व वस्तू आणि त्यांचे सुटे भाग यांच्यावर जीएसटी २८ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर
३) संगमरवर दगडावरील १८ टक्के जीएसटी ५ टक्क्यांवर
४) चालण्यासाठीची आधारकाठी, लाकडी बूच, राखेपासून बनवलेल्या विटांवरील जीएसटी १२ वरून ५ टक्क्यांवर
५) संगीतावरील पुस्तकांचा कर १२ वरून शून्यावर
६) १०० रुपयांवरील सिनेमाच्या तिकिटावरील जीएसटी २८ वरून १८ टक्क्यांवर
७) १०० रुपयांपर्यंतच्या सिनेमाच्या तिकिटावरील जीएसटी १८ वरून १२ टक्क्यांवर
८) मालवाहू वाहनाच्या विमा हप्त्यावरील जीएसटी १८ वरून १२ टक्क्यांवर
९) जनधन योजनेतील ठेवींसाठी बँकातर्फे देण्यात येणाऱ्या सेवा जीएसटीमुक्त
१०) धार्मिक यात्रांच्या हवाई प्रवासावर लागणारा १८ टक्के कर इकॉनॉमी श्रेणीसाठी पाच टक्के, तर बीझनेस श्रेणीसाठी १२ टक्के करण्यात आला
११) बायोगॅस प्रकल्प, सौरऊर्जेवरील उपकरणे, सौरऊर्जा निर्मिती यंत्रणांवर ५ टक्के जीएसटी. अशा प्रकल्पांसाठी लागणाऱ्या वस्तू आणि सेवांवर पूर्वीप्रमाणेच १२) मॉनिटर आणि ३२ इंचापर्यंतचे दूरचित्रवाणी संच, डिजिटल कॅमेरा आणि व्हिडीओ कॅमेरा रेकॉर्डर, मोबाइल पॉवर बँक, व्हिडीओ गेम नियंत्रक, क्रीडा साहित्य, वाहनांचे ट्रान्समिशन शाफ्ट, गिअर बॉक्स इत्यादीसाठी २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर जीएसटी.
१३) थर्ड पार्टी विम्यावर १८ ऐवजी १२ टक्के जीएसटी.