अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन निमित्ताने ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने उत्कृष्ट वैद्यकीय सेवा देणाऱ्यांचा सन्मान
कणकवली (प्रतिनिधी):- अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन निमित्ताने ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने श्री. प्रशांत चंद्रकांत बुचडे (आरोग्य सहाय्यक-कणकवली) आणि सौ.नयना मुसळे (अधिपरिचारिका, उपजिल्हा रुग्णालयात-कणकवली) यांचा मा. तहसीलदार आर. जे. पवार यांच्या हस्ते सन्मान पत्र व गुलाब पुष्प देवून गौरव करण्यात आला.
कोरोना महामारीच्या कालावधीत रुग्णांची सेवा करून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी ह्युमन राईटसच्या सभासदांना मा. तहसीलदार आर. जे. पवार यांच्या हस्ते ओळख पत्र देण्यात आले. तसेच डाॅ. हर्षदकुमार पटेल, प्रवीण गायकवाड, शिंदे, देसाई काका यांचा सत्कार करण्यात आला.
ह्या कार्यक्रमाला ह्युमन राईटस असोसिएशचे जिल्हाध्यक्ष श्री. संतोष नाईक, जिल्हा निरीक्षक श्री. मनोज तोरसकर, जिल्हा महिला संघटक सौ. गीतांजली कामत, कणकवली तालुका उपाध्यक्ष श्री. संदेश बांदेकर, सहसचिव सौ. संजना सदडेकर, रात्रीस खेळ चाले या मालिकेतील कलाकार श्री. अभय खडपकर, मनोज वारे, डाॅ. हर्षदकुमार पटेल, देसाई काका, उदयकुमार पाटील, प्रदिप गायकवाड, संदिप रेवंडकर, नगरपंचायत कर्मचारी शिंदे, साईनाथ गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.