उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- मंगळवार १७ ऑगस्ट २०२१

मंगळवार दिनांक १७ ऑगस्ट २०२१
राष्ट्रीय मिती श्रावण- २६
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- श्रावण शुक्ल पक्ष दशमी १८ ऑगस्टच्या पहाटे ३ वाजून २० मिनिटापर्यंत

नक्षत्र- जेष्ठा १८ ऑगस्टच्या रात्री १ वाजून ३४ मिनिटापर्यंत,
योग- वैधृति १८ ऑगस्टच्या रात्री १२ वाजून ०२ मिनिटापर्यंत

करण १- तैतिल संध्याकाळी १६ वाजून २८ मिनिटापर्यंत
करण २- गरज १८ ऑगस्टच्या पहाटे ३ वाजून २० मिनिटापर्यंत

चंद्रराशी- वृश्चिक १८ ऑगस्टच्या रात्री १ वाजून ३४ मिनिटापर्यंत

सूर्योदय- सकाळी ०६ वाजून २३ मिनिटांनी तर
सूर्यास्त- सायंकाळी १९ वाजून ०३ मिनिटांनी आणि

चंद्रोदय- दुपारी १४ वाजून २३ मिनिटांनी होईल.
चंद्रास्त- रात्री १२ वाजून ५९ मिनिटापर्यंत.

ओहोटी- रात्री १२ वाजून १२ वाजता आणि दुपारी १३ वाजून ४ मिनिटांनी
भरती- सकाळी ७ वाजून ०६ मिनिटे आणि सायंकाळी १८ वाजून २९ मिनिटे

दिनविशेष:- मंगलागौरी पूजन-व्रत.

१७ ऑगस्ट १६६६ हा दिवस शिवप्रेमींसाठीच नाही तर इतिहासासाठी खूप खूप महत्वाचा! छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या नजरकैदेतून दिवसा-ढवळ्या, १००० सैनिक खडा पहारा देत असताना पसार झाले. ३१ वर्षानंतर २१ फेब्रुवारी १७०७ रोजी म्हातारा बादशहा हाच सल घेऊन ‘अल्लाला प्यारा’ झाला. दख्खन तो कधीच जिंकू शकला नाही!

You cannot copy content of this page