कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी इच्छूक असल्यास नोंदणीचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी:- (जि.मा.का.) : जिल्ह्यातील महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, माध्यमिक विद्यालय, औद्योगिक आस्थापना, असोसिएशन, सामाजिक संस्थांच्या मार्फत कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी इच्छूक असल्यास www.skillndia.gov.in या पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ग.प्र.बिटोडे यांनी केले आहे.
पोर्टलवर नोंदणी केल्यावर आपणांस TP/TC नंबर दिले जातील. त्यांनतर आपण महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी यांच्यामार्फत विविध योजनेंतर्गत प्रशिक्षण देवू शकता. या विविध योजना पुढीलप्रमाणे आहेत.
केंद्र शासन पुरस्कृत योजना:- प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना. उपजिविकसाठी कौशल्य संपादन व ज्ञान जागरुकता अभियान. राज्य शासन पुरस्कृत योजना :- प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान. जिल्हा पुरस्कृत योजना:- किमान कौशल्य विकास कार्यक्रम जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण).
वरील सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रशिक्षण संस्थांना सूचिबध्द होणे गरजेचे आहे. तरी महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्याल, माध्यमिक विद्यालय, औद्योगिक आस्थापना, असोसिएशन, सामाजिक संस्थानी www.skillndia.gov.in व Training provider आणि Training centre म्हणून नोंदणी करावी.
कौशल्य विकास प्रशिक्षणांतर्गत देशातील जास्तीत जास्त उमेदवारांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने स्किल इंडिया पोर्टल विकसीत केले आहे. विविध क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षण देवून नोकरीसाधक उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगार प्राप्त करुन देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
जिल्ह्याच्या कौशल्य सर्वेक्षण मागणीनुसार जिल्ह्यात प्रशिक्षण संस्था तयार झाल्यास इच्छूक उमेदवारांना कौशल्य आधारित प्रशिक्षण देवून रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या जाऊ शकतात. जिल्ह्याचा कौशल्य विकास कृती आराखडा सन 2023-24 ला कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समिती सिंधुदुर्ग मार्फत मान्यता देण्यात आलेली आहे.