तीन वर्षांत देशात तेरा लाखांहून अधिक व महाराष्ट्रात पावणे दोन लाखांहून अधिक महिला बेपत्ता!

नवीदिल्ली:- केंद्रीय गृह मंत्रालयाने संसदेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या तीन वर्षात देशात 13 लाखांहून अधिक महिला व मुली बेपत्ता झाल्या आहेत. महाराष्ट्राचा विचार करता आलेली आकडेवारीसुद्धा चिंताजनक आहे. महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षाच्या कालावधीत 1 लाख 78 हजार 400 महिला आणि 13 हजार 33 मुली बेपत्ता झाल्या आहेत.

२०१९ ते २०२१ या तीन वर्षांच्या कालावधीत भारतात १३ लाख १३ हजार मुली आणि महिला बेपत्ता झाल्या. मध्य प्रदेश मधून सर्वाधिक महिला हरविल्या आहेत. तर यामध्ये पश्चिम बंगालचा दुसरा क्रमांक लागतो.

केंद्रीय गृह मंत्रालयाने संसदेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार २०१९ ते २०२१ या काळात,

१) १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या १० लाख ६१ हजार ६४८ महिला देशातून बेपत्ता झाल्या.
२) १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या २ लाख ५१ हजार ४३० मुली बेपत्ता झाल्या.
३) मध्य प्रदेशातून १ लाख ६० हजार १८० महिला आणि ३८ लाख २३४ मुली बेपत्ता झाल्या.
४) पश्चिम बंगालमधून १ लाख ५६ हजार ९०५ महिला आणि ३६ हजार ६०६ मुली बेपत्ता झाल्या.
५) महाराष्ट्रातून १ लाख ७८ हजार ४०० महिला आणि १३ हजार ३३ मुली बेपत्ता झाल्या.
६) ओडिशात ७० हजार २२२ महिला आणि १६ हजार ६४९ मुली बेपत्ता झाल्या.
७) छत्तीसगडमध्ये ४९ हजार ११६ महिला आणि १० हजार १८७ मुली बेपत्ता झाल्या.
८) दिल्लीतून ६१ हजार ५४ महिला आणि २२ हजार ९१९ मुली बेपत्ता झाल्या.
९) जम्मू – काश्मीरमध्ये ८ हजार ६१७ महिला आणि १ हजार १४८ मुली बेपत्ता झाल्या.

ही आकडेवारी देशाची चिंता वाढविणारी आहे. यासंदर्भात शासनाने आपले धोरण स्पष्ट करणे महत्वाचे आहे. देशात किंवा राज्यात कोणत्याही पक्षाचे सरकार असो; वर्षानुवर्षे ह्या आकडेवारीमध्ये बदल दिसत नाही; हे विशेष!