पाकमध्ये राजकीय पक्षाच्या मेळाव्यावर दहशतवादी हल्ला; ३३ ठार!
कराची : पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील बाजौर जिल्ह्यात खार तालुक्यामध्ये जमियत उलेमा इस्लाम-फझल (JUI-F) ह्या राजकीय पक्षाच्या मेळाव्यात दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट केला. सदर ठिकाणी राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यासह ३३ जणांचा जागीच मृत्यू झाला असून, २०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. सदर मेळाव्यात ५०० लोकांचा सहभाग होता. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी घटनास्थळी आरोग्य यंत्रणा कार्यवत झालेली असून जखमींना पेशावर आणि टीमरगेरा येथील रुग्णालयात हलवलं जात आहे. संपूर्ण देशातून वरील घटनेबद्दल शोक व्यक्त होत आहे.