भारताची ‘मिशन शक्ती’ मोहिमेद्वारे अवकाशात उपग्रह पाडण्याची क्षमता सिद्ध

नवीदिल्ली:- भारताने आज आणखी एक नवे तंत्रज्ञान सिद्धीस नेले आहे. अमेरिका, रशिया आणि चीन नंतर भारताने आपल्या महत्त्वाकांक्षी ‘मिशन शक्ती’ अभियानांतर्गत क्षेपणास्त्राद्वारे उपग्रह पाडण्यात यश मिळवले. यासंदर्भातील माहिती पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशाद्वारे दिली. आम्ही ही मोहीम कोणत्याही देशाविरुद्ध राबवलेली नसून ती भारताच्या नागरिकांच्या आणि देशाच्या सुरक्षेसाठी राबवली असल्याचे पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी स्पष्ट केले.

संरक्षण संशोधन व विकास विभाग (डीआरडीओ) आणि ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्थे’ने (इस्रो) यांच्या संयुक्त विद्यमाने ही प्रणाली विकसित करण्याचे प्रयत्न २०१० सालापासून सुरु होते. अवकाशात पृथ्वीपासून ३०० किलोमीटर अंतरावर लो अर्थ ऑर्बिटमध्ये असलेल्या उपग्रहाचा भारताच्या A-Sat क्षेपणास्त्राने अचूक वेध घेतला व आज नवा इतिहास रचला. भारताने अवकाश क्षेत्रातील अत्यंत प्रगत तंत्रज्ञान आत्मसात केले आहे. जमीन, पाणी, हवेतच नव्हे तर अवकाशतही युद्ध लढण्यास समर्थ असल्याचे भारताने दाखवून दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *