केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यास शेजारील देशांच्या नेत्यांना आमंत्रणे

दिल्ली:- २०२४ च्या देशातील सार्वत्रिक निवडणुकांनंतर पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा ९ जून २०२४ रोजी आयोजित केला असून, या प्रसंगी भारताच्या शेजारील आणि हिंदी महासागर क्षेत्रातील नेत्यांना मान्यवर पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.

श्रीलंकेचे राष्ट्रपती मा. श्री. रानिल विक्रमसिंघे, मालदीवचे अध्यक्ष मा. डॉ. मोहम्मद मुइज्जू; सेशेल्स या द्वीपसमूह राष्ट्राचे उपाध्यक्ष मा. अहमद अफिफ, बांगलादेशच्या पंतप्रधान मा. शेख हसीना, मॉरिशसचे पंतप्रधान मा. श्री. प्रविंद कुमार जुगनाथ, नेपाळचे पंतप्रधान मा. श्री. पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ आणि भूतानचे पंतप्रधान मा. शेरिंग तोबगे इत्यादी नेते सोहळ्यास मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

त्याच संध्याकाळी, शपथविधी समारंभात सहभागी होण्याबरोबरच मान्यवर पाहुणे भारताच्या राष्ट्रपती मा. श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात आयोजित भोजनसमारंभात उपस्थित राहतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सलग तिसऱ्यांदा शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी नेत्यांची भेट म्हणजे भारताने ‘नेबरहुड फर्स्ट’ धोरण आणि ‘सागर’ व्हिजनला दिलेले सर्वोच्च प्राधान्य आहे.

You cannot copy content of this page