वाहतुकीस अडथळा आणणारी अवैध दुकाने हटविण्याची आणि गतिरोधक बसविण्याची कणकवली बस स्थानक व्यवस्थापकांची मागणी!

कणकवली (प्रतिनिधी):- कणकवली एस. टी. आगारा समोरील राष्ट्रीय महामार्गावर पुलाखाली कपड्यांच्या अनधिकृत दुकानांमुळे अपघात होण्याची असल्याने सदरची अनधिकृत कपड्यांची दुकाने कायमस्वरूपी बंद करावीत; अशी मागणी करणारे पत्र कणकवली आगार व्यवस्थापकांनी उपविभागीय अभियंता, राष्ट्रीय महामार्ग उपविभाग सावंतवाडी, मुख्याधिकारी नगरपंचायत कणकवली आणि कणकवली पोलीस निरीक्षक यांना दिले आहे.

कणकवली आगार व्यवस्थापक आपल्या पत्रात म्हणतात की, कणकवली बस स्थानकाच्या इन गेट समोरील मार्गात राष्ट्रीय महामार्ग पुलाखालील जागेत अवैध स्टॉल व कपड्यांची दुकाने लावल्याने एस. टी. वाहतुकीस अडथळे निर्माण होतात. त्यामुळे तेथे अपघात होण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही. त्याचप्रमाणे पुलाखालील मागार्वर गतिरोधक नसल्याने वाहने वेगात येतात. त्यामुळे सदरची अवैध दुकाने त्वरित हटवून वाहतुकीस होणार अडथळा दूर करावा आणि महामार्ग पुलाखालील सबवे मार्गावर कणकवली बसस्थानकासमोर इन व आउट गेट समोरील मार्गात गतिरोधक बसवावा.

कणकवली शहरात नव्याने झालेल्या राष्ट्रीय महामार्गावर उड्डाण पुलाखाली अनधिकृतपणे दुकाने लावली गेली आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होतात आणि अपघातही होत असतात. यासंदर्भात जनतेमध्ये नाराजी असून या गंभीर समस्येकडे संबंधित यंत्रणेने त्वरित लक्ष दिले पाहिजे आणि कारवाई केली पाहिजे असे मत अनेकांनी आमच्या प्रतिनिधीकडे व्यक्त केले.

You cannot copy content of this page