कोविआच्या कार्यकर्त्या भारती शिवगण यांचे निधन

कणकवली:- मुंबईत वास्तवास असलेल्या कोकण विकास आघाडीच्या कार्यकर्या सौ. भारती विजय शिवगण, वय ४८ यांचे आज दुपारी ह्रदयविकाराच्या झटक्याने रहात्या घरी निधन झाले.

कोरोनाच्या कालखंडात त्यांनी माटुंगा येथील त्यांच्या पोळी-भाजी केंद्रातून ना नफा-ना तोटा तत्वावर अवघ्या पंधरा रुपयात गरीबांसाठी पोटभर नाष्टा देत होत्या. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यातील पोलिसांना काही दिवस नाष्टा देत होत्या. याकरिता समाजातील दानशूर व्यक्तींकडून त्यांना मदत मिळत होती. कोविआच्या कार्यकारणीचे सदस्य म्हणून अनेक वर्षे कार्यरत होत्या. रेड्डीच्या माजी सरपंच चित्रा कनयाळकर यांच्या त्या मोठ्या भगिनी होत्या. त्यांच्या मागे पती व एक मुलगा आहे.

You cannot copy content of this page