मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणींचं लाइव्ह प्रक्षेपण सुरू!
मुंबई:- सर्वोच्च न्यायालयाप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणींचं लाइव्ह प्रक्षेपण सुरू झालंय. लाईव्ह प्रक्षेपण आता सर्वांसाठी खुल झालं असून मुंबई उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर यासाठी स्वतंत्र लिंक उपलब्ध आहे. तसेच ‘व्हीकन्सोल’ ॲपच्या माध्यमातूनही हे लाईव्ह प्रक्षेपण पाहता येणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणीचं थेट प्रक्षेपण लोकांना त्यांच्या आता घरी बसून पाहता येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी या प्रक्रियेला हिरवा कंदील दाखवल्यानंतर आजपासून न्यायालयीन कामकाजाचे थेट प्रक्षेपण सुरू झालंय. त्यामुळे आपल्या प्रकरणात नेमकं काय होतंय?, हे पाहण्यासाठी न्यायालयात लोकांना माराव्या लागणाऱ्या फेऱ्यांपासून आता काहींची सुटका होणार आहे.
कोर्टाचं कामकाज लाइव्ह दाखवण्याची मागणी – मुंबई उच्च न्यायालयाच्या कामकाजाचं थेट प्रक्षेपण प्रसारीत करण्यासाठी जनहित याचिका दाखल केल्याच वकील मॅथ्यूज नेदुमपारा यांनी काही दिवसांपूर्वीच न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल होतं. त्यावर मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठान लवकरत सुनावणीच्या थेट प्रक्षेपणासाठी तांत्रिक व्यवस्था केली जात असल्याचं स्पष्ट केल होत. सुरुवातीला पाच प्रमुख खंडपीठापुढील सुनावणींचे थेट प्रक्षेपण केल जाईल, असंही यावेळी हायकोर्टानं स्पष्ट केल. त्यानुसार आजपासून चार प्रमुख कोर्टाचं लाईव्ह स्ट्रिमिंग सुरू करण्यात आलं आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर सर्वात वरच्या बाजूला याकरिता स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. याशिवाय ‘व्हीकन्सोल’ या ॲपचाही पर्याय देण्यात आला आहे. या ॲपवर तुमच्या मोबाईल नंबरवरून लॉगइन करीत तुम्ही तुमच्या मोबाईलवरही या पाच कोर्टातील सुनावणीचं लाइव्ह प्रक्षेपण पाहू शकता.
‘या’ पाच खंडपीठांपुढील सुनावणी लाइव्ह पाहता येणार…
मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे
न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले
न्यायमूर्ती महेश सोनक आणि न्यायमूर्ती जितेंद्र जैन
न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अखंड
न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती राजेश पाटील