फिनिक्स फाउंडेशन व क्षा. म. समाज आयोजित महाआरोग्य शिबिर संपन्न

मुंबई:- `मानव सेवा हीच ईश्वर सेवा!’ हे ब्रीदवाक्याचे ध्येय समोर ठेऊन कार्य समाजसेवेचे अतुलनीय कार्य करणाऱ्या फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून आणि क्षा. म. समाज संस्थेच्या संयुक्त विद्यमाने `महाआरोग्य शिबिर-२०२२’ नुकतेच डॉ. शिरोडकर समारक मंदिर, परळ, मुंबई येथे संपन्न झाले.

यावेळी फोर्टिस रूग्णालयाच्या टीमने रक्ताच्या विविध तपासण्या, डोळे तपासणी, ईसीजी, हाडांची तपासणी करून महिलांच्या आरोग्यविषयी जनजागृती व विविध शासकीय योजनेतून लहान-मोठ्या शस्त्रक्रिया इ. सेवा व माहिती शिबिरात देण्यात आली. सदर कार्यक्रमास अग्निशिला मासिकाचे संपादक अनिल गलगली हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी सुदृढ आरोग्य व्यवस्था व आरोग्य विषयक योजनांची माहिती सामान्यांपर्यंत पोहचवून शिबीर आयोजित केल्याबद्दल सध्या काळाची गरज असल्याचे मत व्यक्त करून अभिनंदन केले.

डाॅ. सोनाली मणियार (सिनीअर कन्सलटंट,फोर्टीस हाॅस्पीटल) यांनी महिलांसाठी कर्करोग आजार व काळजी दृकश्राव्याव्दारे माहिती दिली. डाॅ.अलका थरवळ, डाॅ.प्रविण बागुल यांनी वैद्यकीय हलगर्जीपणा व सुयोग्य डाॅक्टरची निवड यावर मार्गदर्शन केले.

त्यावेळी क्षा. म. समाज संस्थेचे पदाधिकारी, विश्वस्त व सुकाणू समिती सदस्य तसेच बीजेपी शिवडी विधानसभा अध्यक्ष दिलीप धुरी, रूग्ण मित्र धनंजय पवार, रूपेश चॅरिटेबल ट्रस्टचे किरण गिरकर, सह्याद्री मैत्री फाउंडेशनचे संजय पाटील, विवेक मयेकर, जय श्रीकृष्ण चॅरिटेबल ट्रस्टचे पंकज नाईक, अनिल गुरव, प्रसन्न फाउंडेशनच्या श्रध्दा अष्टीवकर, आरंभ सामाजिक प्रतिष्ठानच्या अमृता पुरंदरे, मनसेचे उपशाखाध्यक्ष गितेश खेडेकर, ज्योती फाउंडेशनचे मयुरेश कांबळे, अजिंक्य युवा प्रतिष्ठानचे प्रसाद मांडवलकर, संघमित्रचे हणमंत शिर्के, स्वराज्य एकता युवा फाउंडेशनचे मंगेश तांबे, रूग्णसेवक जयकिशन डुलगच, एमएलएसचे विद्यार्थी राम पाटील, स्पर्श शेडे इ.मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विनोद साडविलकर यांनी केले.

आयोजक फिनिक्स फाउंडेशनचे जितेंद्र लोके आणि त्यांचे सहकारी विनोद साडविलकर, गीता लोके, विश्वनाथ कदम यांनी सदर मोफत वैद्यकीय शिबीर यशस्वीपणे घेतल्याबद्दल सर्वच थरातून त्यांचे कौतुक होत आहे. फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून सन्मानिय जितेंद्र लोके अनेकविध समाजसेवेचे उपक्रम राबवित असतात. वैद्यकीय शिबिराच्या माध्यमातून आजपर्यंत फिनिक्स फाऊंडेशन ह्या सेवाभावी संस्थेने हजारो रुग्णांवर मोफत वैद्यकीय उपचार केले आहेत, आरोग्याचा विविध तपासण्या विनाशुल्क केल्या आहेत. त्याचप्रमाणे फिनिक्स फाऊंडेशन वृद्धाश्रम चालविते.