ठाकरे सरकार आणि मुंबई मनपा कारभारावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात!
मुंबई:- विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर भाषण करताना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील ठाकरे सरकार आणि मुंबई मनपा कारभारावर ताशोरे ओढले. त्यावेळी त्यांनी अनेक गंभीर आरोप केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून अगदी कायदा सुव्यवस्थेबद्दल सरकारला धारेवर धरले. अनेक गंभीर प्रकारणांकडे सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. तर कोरोना महामारीच्या काळातही मुंबई महानगर पालिकेचा कारभारावर कसा भ्रष्टाचाराच्या दलदलीत रुतला? त्याचा पाढा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी वाचला.
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या संपूर्ण भाषणातून भविष्यात महाराष्ट्र सरकार चालविताना सत्ताधाऱ्यांना कोणत्या आरोपांना सामोरं जावं लागणार आहे आणि मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप कसा आक्रमक होणार आहे? ह्याचा अंदाज येतो. म्हणूनच संपूर्ण व्हिडीओ पाहणे आवश्यक ठरतो!