राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश!
मुंबई:- राज्यात विधानसभा निवडणुकीत राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले व महाविकास आघाडीचा अक्षरशः धुव्वा उडाला आहे. महायुतीत एकट्या भाजपने १३२ हून अधिक जागा जिंकल्या आहेत. १९९० नंतर विधानसभा निवडणुकीत सार्वधिक जागा जिंकणारा भाजप हा पहिला पक्ष ठरला आहे. भाजपने २०१४ पासून सलग तिसऱ्यांदा शतकी मजल मारली आहे. मुख्यमंत्रिपदाचा निर्णय झाल्यानंतर राज्यपालांची भेट घेऊन महायुतीकडून सत्तास्थापनेचा दावा केला जाणार आहे. नव्या सरकराचा शपथविधी वानखेडे स्टेडियम, शिवाजी पार्कवर होण्याची शक्यता आहे.
पक्षनिहाय आकडेवारी
क्र. | पक्ष | विजयी आमदार |
1 | भारतीय जनता पार्टी – भाजपा | १३२ |
2 | शिवसेना | ५७ |
3 | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) | ४१ |
4 | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) | २० |
5 | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | १६ |
6 | राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार | १० |
7 | समाजवादी पक्ष – सपा | २ |
8 | जन सुराज्य शक्ती | २ |
9 | राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्ष | १ |
10 | राष्ट्रीय समाज पक्ष | १ |
11 | ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन | १ |
12 | भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) – सीपीआय(एम) | १ |
13 | भारतीय शेतकरी आणि कामगार पक्ष | १ |
14 | राजर्षी शाहू विकास आघाडी | १ |
15 | अपक्ष | २ |