आई बहिणीवरून शिव्या देणाऱ्यांविरोधात कडक कायदा करा! -आमदार डॉ. भारती लव्हेकर 

मुंबई (मोहन सावंत):- “आई बहिणीवरून शिव्या आम्ही कधीही सहन करणार नाही. आई बहिणीवरून शिव्या देणाऱ्यांविरोधात कडक कायदा झालाच पाहिजे!” अशी जोरदार मागणी आमदार डॉ. भारती लव्हेकर यांची आज विधानसभेत केली.

महाराष्ट्राच्या २०२४-२५ अर्थसंकल्पाला समर्थन देताना आज विधानसभेत वर्सोवा मतदार संघाच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर बोलत होत्या! त्या म्हणाल्या की, मी नेहमी बघते, विधानसभा असो विधानपरिषद असो किंवा बाहेरचे लोक असू द्या; नेहमी आई बहिणीवरून शिव्या दिल्या जातात. आई बहिणीवरून शिव्या देणे, हा आमचा अपमान नाही का? ह्या संदर्भात कायदा असला पाहिजे. आई बहिणीवरून जर कुणी शिव्या दिल्यात तर ते आम्ही खपवून घेणार नाही. यापुढे कोणी आई बहिणीवरून शिव्या देणाऱ्याच्या विरोधात कडक कायदा आणावा!

तत्पूर्वी आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राज्यातील महिलांसाठी आणलेल्या अनेक योजनांसाठी आभार मानले. सर्व योजनांचे कौतुक करून त्या महिलांसाठी कशा लाभदायी आहेत ते सांगितले.

You cannot copy content of this page