नारायण राणे केंद्रीय मध्यम व लघु उद्योगमंत्री

नवीदिल्ली:- मोदी सरकारचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आज झाला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, भाजपचे नेते नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली असून ते मध्यम व लघु उद्योगमंत्री झाले आहेत. तर कपिल पाटील पंचायती राज राज्यमंत्री, भारती पवार आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री आणि भागवत कराड अर्थ राज्यमंत्री झाले.

कोणाकडे कोणतं खातं….

पंतप्रधान नरेंद्र मोदी – विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय (अतिरिक्त भार)
मनसुख मांडवीय – आरोग्य मंत्री, रसायन मंत्री
अमित शाह – सहकार मंत्री (अतिरिक्त भार)
ज्योतिरादित्य सिंदिया – हवाई वाहतूक मंत्री
अनुराग ठाकूर – माहिती व प्रसारण मंत्री, युथ अफेअर्स
हरदीप पुरी – नागरी विकास, गृहनिर्माण आणि पेट्रोलियम मंत्री
नारायण राणे – मध्यम व लघु उद्योग मंत्री
धर्मेंद्र प्रधान – शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री
अश्विनी वैष्णव – रेल्वे मंत्री आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्री
पियुष गोयल – उद्योगमंत्री
स्मृती इराणी – महिला व बाल कल्याण मंत्री
सरबानंद सोनोवाल – बंदर आणि जलवाहतूक मंत्री, आयुष मंत्रालय
पशुपतीकुमार पारस – अन्न प्रक्रिया मंत्री
गजेंद्रसिंह शेखावत – जलशक्ती मंत्री
पुरुषोत्तम रुपाला – मासेमारी, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय मंत्री

राज्यमंत्री
भगवंत खुबा – अपारंपरिक उर्जा विभाग आणि खते-रसायन विभाग राज्यमंत्री
कपिल पाटील – पंचायती राज राज्यमंत्री
प्रतिमा भौमिक – सामाजिक न्याय राज्यमंत्री
सुभास सरकार – शिक्षण राज्यमंत्री
राजकुमार रंजन सिंह – परराष्ट्र विभाग आणि शिक्षण राज्यमंत्री
भारती पवार – आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री
विश्वेश्वर टुडू – आदिवासी विकास आणि जलशक्ती विभाग राज्यमंत्री
शांतनु ठाकूर – बंदर, जलवाहतूक राज्यमंत्री
मुंजपरा महेंद्र – महिला व बालकल्याण आणि आयुष विभाग राज्यमंत्री
जॉन बारला – अल्पसंख्याक राज्यमंत्री
एल. मुरुगन – मासेमारी, पशुपाल आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री, माहिती व प्रसारण राज्यमंत्री
निसिथ प्रामाणिक – गृह राज्यमंत्री, युवा आणि क्रीडा राज्यमंत्री
अनुप्रिया पटेल – उद्योग राज्यमंत्री
एस. पी. बघेल – कायदा व न्याय राज्यमंत्री
राजीव चंद्रशेखर – कौशल्य विकास, माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री
शोभा करंदलजे – कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री
दर्शन जरदोश – टेक्स्टाईल, रेल्वे राज्यमंत्री
व्ही. मुरलीधरन – परराष्ट्र, संसदीय कार्य राज्यमंत्री
मीनाक्षी लेखी – परराष्ट्र, सांस्कृतिक राज्यमंत्री
अन्नपूर्णा देवी – शिक्षण राज्यमंत्री
अजय भट – संरक्षण, पर्यटन राज्यमंत्री
अजय कुमार – गृह राज्यमंत्री